महिलांच्या सुरक्षेवरुन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मुंबईत आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्रासोबत घरी जात असलेल्या तरुणीला लोखंडी हत्याराचा धाक दाखवत तिच्यावर तिच्याच ओळखीच्या एका इसमाने बलात्कार केल्याची घटना शुक्रवारी पहाटे चेंबूर येथे घडली आहे. याबाबत चेंबूर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
पीडित तरुणी चेंबूरच्या कॅम्प परिसरात आपल्या परिवारासोबत राहते. गुरुवारी मध्यरात्री ती एका मित्रासोबत मरिन ड्राइव्ह येथे फिरण्यासाठी गेली होती. शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास दोघेही घरी परतत असताना, चेंबूरच्या नॅशनल शाळेजवळ त्यांना एकाने अडवले. या आरोपीने या दोघांना एका लोखंडी हत्याराचा धाक दाखवला. याच वेळी तरुणीसोबत असलेल्या तिच्या मित्राने तरुणीला एकटीच सोडून पोबारा केला.
त्यानंतर हत्याराचा धाक दाखवत आरोपी पीडित तरुणीला घेऊन तेथील नॅशनल कॉलेजच्या समोरील गल्लीमध्ये गेला. निर्मनुष्य असलेल्या या गल्लीमध्ये त्याने बलात्कार केल्याचा आरोप तरुणीने केला आहे.
मुल होत नाही म्हणून पत्नीला मित्रासोबत संबंध ठेवण्याची बळजबरी, पतीसह मित्र अटकेत
तरुणीने याबाबत चेंबूर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास करत यामध्ये आरोपी धीरज राजकुमार सिंग (वय २४) याला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयासमोर हजर केलं असून त्याला ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ADVERTISEMENT