दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांच्या पत्नी व ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांची प्रकृती बिघडली आहे. सायरा बानो यांना श्वास घेण्यास त्रास सुरू झाल्यानंतर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
सायरा बानो यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांची शुगर वाढली. त्याचबरोबर त्यांचा रक्तदाबाची (blood pressure) पातळी वाढल्याने अस्वस्थ वाटू लागलं होतं. श्वास घेण्यासही त्रास होत असल्यानं त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
सायरा बानो यांना ICU मध्ये भरती करण्यात आलं असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहे. डॉक्टरांकडून त्यांच्या आवश्यक चाचण्या केल्या जात असल्याची वृत्त आहे.
सायरा बानो यांना मागील तीन दिवसांपासून ब्लड प्रेशरमुळे अस्वस्थ वाटत होतं. त्यांचं ब्लड प्रेशर तीन दिवसांपासून वाढलं आहे. औषधींमुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात येत नसल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनामुळे सायरा बानो यांना मोठा धक्का बसला होता. त्या दुःखातून त्या अद्यापही सावरलेल्या नाहीत. ७ जुलै रोजी दिलीप कुमार यांचं निधन झालं होतं. तेव्हापासून शांतशांत राहत होत्या.
शेवटपर्यंत दिलीप कुमारांच्या सोबत
दिलीप कुमार हे दीर्घकाळापासून आजारी होते. त्यांच्या आजारपणाच्या काळात सायरा बानो या सतत त्यांच्यासोबत असायच्या. अनेक कार्यक्रमांमध्ये दिलीप कुमार आणि सायरा बानो सोबत दिसायचे. इतकंच नाही, तर दिलीप कुमार यांच्या प्रकृतीबद्दलही सायरा बानो नेहमी माहिती देत राहायच्या. त्यामुळे दिलीप कुमार यांच्या जाण्यानं त्यांना मोठा धक्का बसला.
ADVERTISEMENT