मुंबई: कॉमेडियन सुनील ग्रोव्हरच्या चाहत्यांसाठी एक चिंताजनक बातमी आहे. सुनील ग्रोव्हरवर नुकतीच हृदय शस्त्रक्रिया (heart surgery) झाली आहे. याबाबतची संपूर्ण माहिती अभिनेत्री सिमी ग्रेवालने ट्विटद्वारे दिली आहे. सुनील ग्रोव्हरवर अचानक शस्त्रक्रिया करावी लागल्याचं समजताच त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT
सिमी ग्रेवालने ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘हे जाणून मला धक्का बसला आहे की, सुनील ग्रोव्हरची नुकतीच हार्ट सर्जरी झाली आहे. जी व्यक्ती आपल्याला हसवते आणि आपले हृदय आनंदाने भरुन टाकते.. तो आज असा आहे. हे ऐकून माझं मन भरुन आलं आहे. प्रार्थना करते की, तो लवकरात लवकर बरा व्हावा. त्याचं टॅलेंट अप्रतिम आहे. मी नेहमीच त्याची खूप मोठी चाहती आहे.’
सुनील ग्रोव्हरच्या हृदयाच्या शस्त्रक्रियेबद्दल ऐकून चाहत्यांना धक्का बसला आहे. ते सोशल मीडियावर सतत ट्विट करत आहेत आणि त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहे. एका चाहत्याने लिहिले की, ‘सुनील ग्रोव्हर तू लवकर बरा होवो आणि डॉ. गुलाटी बनून स्टेजवर पुन्हा याावं अशी प्रार्थना करतो.’
अशी आहे सुनील ग्रोव्हरची कारकीर्द
सुनील ग्रोव्हरची आजवरची कारकीर्द ही चढ-उतारांनी भरलेली आहे. त्याने आपल्या करिअरची सुरुवात ही टीव्हीपासून केली. तो ‘चला लल्ला हीरो बने’ या शोमध्ये पहिल्यांदा दिसला होता. याशिवाय टीव्हीवरील लोकप्रिय शो ‘गुंटूर गूं’मध्येही सुनील लोकांना हसवताना पाहायला मिळाला होता.
सुनील आणि कपिल शर्मा यांची मैत्री तर सर्वश्रुतच आहे. कॉमेडी शो ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’मध्ये दोघेही प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करताना दिसले होते. या शोमध्ये सुनीलने ‘गुत्थी’ आणि ‘डॉ. ‘मशहूर गुलाटी’ या भूमिका साकारल्या, ज्यांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. सुनीलची ही दोन्ही पात्रे चाहत्यांमध्ये खूपच लोकप्रिय झाली.
सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ आहेत, ज्यावर चाहते सुनीलच्या व्यक्तिरेखेबद्दल अभिनय करताना दिसतात. सुनीलच्या मोठ्या पडद्यावरील कारकीर्दीबाबत सांगायचे तर, तो ‘हिरोपंती’, ‘बागी’, ‘जिला गाझियाबाद’, भारत आणि ‘गजनी’मध्ये दिसला आहे. यासोबतच सुनील ‘सनफ्लॉवर’ आणि ‘तांडव’ या वेबसिरीजमध्येही दिसला होता.
सुनील ग्रोव्हर हे आता टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील मोठं नाव बनलं आहे. सुनील Zee5 च्या क्राईम-कॉमेडी सीरीज ‘सनफ्लॉवर’मध्ये देखील दिसला होता. या मालिकेचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले होते. याशिवाय सुनील ग्रोवर बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानसोबत ‘भारत’ चित्रपटातही दिसला होता. जवळपास मुख्य भूमिका साकारणाऱ्या सुनीलच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते. त्याची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. समीक्षकांमध्येही त्यांच्या कामाचे कौतुक झाले होते.
याशिवाय सुनील ग्रोव्हर काही काळापूर्वी सलमान खानसोबत ‘द बँग द टूर’ (Da Bangg The Tour Reloaded) मध्येही दिसला होता. त्याने सलमानच्या लग्नाविषयी अनेक प्रश्न विचारले होते. त्याच्या या प्रश्नावर सलमान देखील लाजलेला पाहायला मिळाला होता.
ADVERTISEMENT