कोरोना व्हायरसने संपूर्ण देशाची परिस्थिती गंभीर झाली आहे. व्हायरसचा प्रसार अधिक होताना दिसत असून रूग्णांच्या संख्येत देखील वाढ होताना दिसतेय. अनेक ठिकाणी बेड्स तसंच ऑक्सिजनची कमतरता दिसून येतेय. रूग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी अनेक बॉलिवूड कलाकार पुढे आलेत. अशातच आता अभिनेत्री आलिया भटनेही मदतीसाठी पुढाकार घेतलाय.
ADVERTISEMENT
आलिया भटने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट शेअर केलंय. या ट्विटमध्ये तिने एक फोटो पोस्ट केला असून यामध्ये काही संस्थांची नाव आणि माहिती देण्यात आली आहे. सध्याच्या कोरोना परिस्थितीत लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून काम करणाऱ्या सामाजिक संस्थांची माहिती आलियाने दिलीये. हेमकुंट फाउंडेशन, हसिरू डाला फाऊंडेशन, रूरल हेल्थकेअर फाऊंडेशन आणि नोतून जीबन अशी या संस्थांची नावं असून त्यांचे फोन नंबर देखील देण्यात आले आहेत.
आलियाने शेअर केलेल्या संस्था ऑक्सिजन, अॅम्ब्युलन्स तसंच लोकांना जेवण पुरवण्याचं काम करतात. त्याचप्रमाणे रूग्णांना औषधं पुरवण्याचं कामंही या संस्थेकडून केलं जातं.
आतापर्यंत अनेक सेलेब्रिटींनी कोरोनाग्रस्त रूग्णांना मदतीचा हात पुढे केलाय. यामध्ये सोनू सूद, सोनू निगम, ट्विंकल खन्ना तसंच अजय देवगण या सेलिब्रिटींचा समावेश आहे.
ADVERTISEMENT