बॉलिवूड अॅक्ट्रेस सोनाक्षी सिन्हाविरोधात काही दिवसांपूर्वी एका इव्हेंट मॅनेजरने फसवणूक केल्याची तक्रार नोंदवली होती. मात्र आपल्या विरोधात हा खोटा कांगावा करण्यात येत असल्याचं सोनाक्षी सिन्हाने प्रसारमाध्यमांना सांगितलं होतं. मात्र तिच्या याच वक्तव्यामुळे तिच्या अडचणी वाढल्या आहेत. मुरादाबादमधल्या इव्हेंट मॅनेजरने वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या विरोधात अॅफेडेव्हिट केलं आहे. यामध्ये या मॅनेजरने हे म्हटलं आहे की सोनाक्षी सिन्हाने माझ्याविरोधात अपशब्द वापरले.
ADVERTISEMENT
या प्रकरणी सोनाक्षी सिन्हाच्या विरोधात मुरादाबाद येथील कटघर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. प्रमोद शर्मा यांनी सोनाक्षी सिन्हा आणि इतर पाच जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात सोनाक्षी सिन्हाच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आलं. ज्यानंतर सोनाक्षी सिन्हाने जे वक्तव्य केलं ते वृत्तपत्रांमध्ये छापून आलं. यामध्ये तिने प्रमोद शर्माच्या विरोधात अपशब्द वापरले असा आरोप करण्यात आला आहे.
सोनाक्षी सिन्हाने जे वक्तव्य केलं त्यानंतर इव्हेंट मॅनेजर प्रमोद शर्मा यांचे वकील आशुतोष यांनी सीजेएम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. आशुतोष त्यागी यांनी हे म्हटलं आहे की जे प्रकरण सोनाक्षी सिन्हा आणि तिच्या इतर पाच जणांच्या विरोधात कटघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर या आरोपांना नाकारत सोनाक्षी सिन्हाने जे वक्तव्य केलं होतं त्यात प्रमोद शर्मा यांच्याबाबत अपशब्द वापरण्यात आले. सोनाक्षी सिन्हाने फक्त आरोप फेटाळले नाहीत तर माझे अशील प्रमोद शर्मा यांच्याबाबत अपशब्दही वापरले असं आशुतोष त्यागी यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.
मीडिया, टीव्ही, वृत्तपत्रांमध्ये ज्या बातम्या आल्या त्यामध्ये सोनाक्षी सिन्हाने माझे अशील प्रमोद शर्मा यांच्याबाबत चुकीचं वक्तव्य केलं त्यामुळे आम्ही सगळे पुरावे गोळा करून त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी ४ एप्रिलला होणार आहे.
ADVERTISEMENT