छत्रपतींच्या वंशजांवर बेताल वक्तव्य केल्या प्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली. आज सकाळी सव्वा अकरा वाजता सातारा जिल्हा आणि सत्र न्यायालयात न्यायाधिश शेंडगे यांच्या समोर गुणरत्न सदावर्ते यांना हजर करण्यात आले होतं.
ADVERTISEMENT
Gunaratna sadavarte : “सदावर्ते सरकारसाठी व्हिलन”; न्यायालयात नेमकं काय घडलं?
गुणरत्न सदावर्तेंना हजर केल्यानंतर दोन्ही पक्षाकडून युक्तिवाद करण्यात आला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे या चार दिवसांमध्ये अन्य काही माहिती समोर येते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे सातारा पोलीस चार दिवसात कसून चौकशी करणार असेल बऱ्याच काही घटना समोर येण्याची शक्यता आहे
मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी गुरुवारी सदावर्ते यांच्या विरोधात सातारा पोलीस ठाणे येथे घोषणाबाजी केल्याने आज शहर पोलीस ठाणे आणि न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
काय आहे प्रकरण?
दोन वर्षांपूर्वी गुणरत्न सदावर्ते यांनी एका खासगी न्यूज चॅनलला दिलेल्या मुलखातीत उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे भोसले यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची भावना तयार झाली होती. सातारा शहर पोलीस ठाण्यात राजेंद्र निकम यांनी गुणरत्न सदावर्तेंच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
राजघराण्यातील सदस्यांबद्दल अफजलाची औलाद आणि राजघराण्याला मानत नाही, असे वादग्रस्त विधान करणाऱ्या ऍड. गुणरत्न सदावर्तेंना सातारा पोलिसांनी आर्थररोड जेल मधून गुरुवारी ताब्यात घेतलं. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.
मराठा आरक्षणाला विरोध, शरद पवारांच्या सिल्वर ओक बंगल्यावरील हल्ला अश्या कारणांनी कायम वादग्रस्त भूमिकेत राहिलेले अॅड. सदावर्ते आर्थर रोड जेलमध्ये होते. दरम्यान, सातारा – कोल्हापूर राजघराण्याबद्दल या अफजल्याच्या औलादी आणि असल्या घराण्याला मी मानत नाही असे विधान केल्याबद्दल त्याच्यावर 9 ऑक्टोबर 2020 ला सातारा शहर पोलिसांत दाखल झाला होता.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. सध्या गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे आहे. गुरूवारी मुंबई पोलिसांकडून सातारा पोलिसांनी सदावर्तेंचा ताबा घेतला होता. संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं होतं. रात्री उशिरा त्यांना सातारा येथे आणलं गेलं. त्यांना सकाळी 11 वाजता कोर्टात हजर करण्यात आलं. कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयानं त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. गुणरत्न सदावर्ते जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांनी घोषणाही दिल्या.
ADVERTISEMENT