Video : सगळं संपलंय!; अफगाणिस्तानातून भारतात परतलेल्या खासदाराला कोसळलं रडू

मुंबई तक

• 01:12 PM • 22 Aug 2021

अफगाणिस्तानातील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चाललेली असून, या तेथील भयावह स्थितीबद्दल बोलताना भारतीय वंशाचे खासदार नरेंद्र सिंग खालसा यांना रडू कोसळलं. तर भारतीय हवाई दलाच्या विमानातून भारतात आलेल्या एका महिलेनं सुटकेचा निःश्वास टाकत भारताचे आभार मानले. अफगाणिस्तानात तालिबानचं राज्य आलं. त्यानंतर अफगाणिस्तानातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून, अनेक नागरिक शेजारी असणाऱ्या देशांमध्ये आश्रय […]

Mumbaitak
follow google news

अफगाणिस्तानातील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चाललेली असून, या तेथील भयावह स्थितीबद्दल बोलताना भारतीय वंशाचे खासदार नरेंद्र सिंग खालसा यांना रडू कोसळलं. तर भारतीय हवाई दलाच्या विमानातून भारतात आलेल्या एका महिलेनं सुटकेचा निःश्वास टाकत भारताचे आभार मानले.

हे वाचलं का?

अफगाणिस्तानात तालिबानचं राज्य आलं. त्यानंतर अफगाणिस्तानातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून, अनेक नागरिक शेजारी असणाऱ्या देशांमध्ये आश्रय घेऊ लागले आहेत. दरम्यान, अफगाणिस्तानातील भारतीयांना मायदेशी आणलं जात असून, या विमानातून अनेक अफगाणी नागरिकही येत आहेत.

अफगाणिस्तानात तालिबानी राज आल्यानंतर परिस्थिती बिघडली आहे. अनेक नागरिक इतर देशांच्या आश्रयाला गेले असून, अनेकांनी भारतात स्थलांतर केलं आहे. अफगाणिस्तानातून भारतीयांना अफगाणिस्तानातून मायदेशात आणलं जात आहे.

‘२० वर्षात जे उभं केलं, ते सगळं संपलं’

अफगाणिस्तानच्या संसदेचे सदस्य असलेले मूळ भारतीय वंशाचे खासदार नरेंद्र सिंग खालसा भारतात आले. विमानतळावर माध्यमांशी बोलताना त्यांचे डोळे भरून आले. ‘अफगाणिस्तानातील परिस्थिती चिंताजनक आहे. आमचं सगळं तिथेच सुटलं आहे. परिस्थिती इतकी खराब आहे की, मला रडायला येत आहे. अनेक पिढ्यांपासून आम्ही अफगाणिस्तानात राहत होतो. आमचं सगळंच संपलं आहे. २० वर्षांपासून सरकार अस्तित्वात आलं होतं. पण सगळं संपलंय. आता फक्त शून्य उरलं आहे’, असं सांगताना अफगाणिस्तानात खासदार असलेल्या नरेंद्र सिंह खालसा यांना अश्रु अनावर झाले.

भारतीय हवाई दलाच्या विमानातून भारतात दाखल झालेल्या अफगाणिस्तानी महिलेनं भारताचे आभार मानले. ‘अफगाणिस्तानात परिस्थिती बिघडत चालली होती. त्यामुळे मी मुलगी आणि दोन नातवडांसह भारतात आले. भारतीय आमच्या मदतीसाठी धावून आले. तालिबानी बंडखोरांनी आमचं घर जाळून टाकलं. आम्हाला मदत केल्याबद्दल भारताचे आभार’, असं अफगाणिस्तानी महिलेनं गाझियाबादमधील हवाई दलाच्या विमानतळावर उतरल्यानंतर म्हटलं.

मागील आठवड्यात अफगाणिस्तान राजकीय अस्थिरतेनं ढवळून निघालं. अमेरिकने सैन्य माघारी निघाल्यानंतर तालिबानने एकापाठोपाठ प्रदेश ताब्यात घेत काबूलला वेढा दिला. त्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी देश सोडून निघून गेले.

    follow whatsapp