Bhagat Singh Koshyari : राजीनामा मंजूर; ‘मविआ’चे नेते काय म्हणाले?

मुंबई तक

12 Feb 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:03 AM)

Uddhav Thackeray, Sharad Pawar and Nana Patole : मुंबई : वादग्रस्त ठरलेले भगतसिंह कोश्यारी (Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari) यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून मुक्त करण्यात आलं. काही दिवसांपासून त्यांना हटवण्याच्या मागणीने जोर धरला होता. कोश्यारींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडेही पदमुक्त करण्याची मागणी केली होती. त्यांनी दिलेला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला. […]

Mumbaitak
follow google news

Uddhav Thackeray, Sharad Pawar and Nana Patole :

हे वाचलं का?

मुंबई : वादग्रस्त ठरलेले भगतसिंह कोश्यारी (Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari) यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून मुक्त करण्यात आलं. काही दिवसांपासून त्यांना हटवण्याच्या मागणीने जोर धरला होता. कोश्यारींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडेही पदमुक्त करण्याची मागणी केली होती. त्यांनी दिलेला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला. आता त्यांच्या जागेवर झारखंडमध्ये राज्यपाल म्हणून कार्यरत असणाऱ्या रमेश बैस (Ramesh Bais) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (After accepting the resignation of Bhagatsinh Koshyari, various leaders of Mahavikas Aghadi have reacted.)

दरम्यान, कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

  • राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार :

आजच्या दिवसाची सुरुवात अतिशय चांगली झाली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने सुटका झाली आहे. राज्यपाल बदलण्याचा निर्णय हा अतिशय चांगला निर्णय आहे. हा निर्णय फार अगोदरच घ्यायला हवा होता. महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही अशी व्यक्ती राज्यपाल झाली नव्हती. राष्ट्रपतींनी राज्यपाल बदलला ही अतिशय समाधानकारक बाब आहे. जे जे संविधानाच्या विरोधात झालं असेल, त्या सगळ्यांची चौकशी व्हायला हवी.

Bhagat Singh Koshyari : कोश्यारींचा राजीनामा मंजूर, बैस नवे राज्यपाल

  • काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले :

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी न करता त्यांचा राजीनामा मंजूर करून केंद्र सरकारने कोश्यारींचा सन्मान आणि महाराष्ट्राचा अवमान केला आहे. भगतसिंह कोश्यारी यांच्या आडून भारतीय जनता पक्षाने सातत्याने महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमानच केला. कोश्यारींनी राजभवनासारख्या घटनात्मक संस्थेचा भाजपा कार्यालयाप्रमाणे वापर करून राजकारणाचा अड्डा बनवले होते. कोश्यारींच्या हाताने महाराष्ट्रद्रोही भाजपने जी पापे केली आहेत त्याची फळे भाजपला भोगावीच लागतील.

  • शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे :

आज चांगला मुहूर्त आहे. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करण्यासाठी उत्तरेतून गागाभट्ट आले होते. आज आम्ही उत्तर भारतीयांमध्ये आलो आहोत. शिवाय छत्रपती शिवाजी जयंतीपूर्वी त्यांचा अपमान करणारं पार्सल परत जात आहे, हा योगायोग आहे

Ramesh Bais: नगरसेवक ते महाराष्ट्राचे राज्यपाल, कोण आहेत रमेश बैस?

  • शिवसेना (UBT) नेते संजय राऊत :

मागील अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रात राज्यपाल बदलण्यात यावेत अशी मागणी होत होती. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल राज्यपालांनी ज्या भूमिका घेतल्या, त्यामुळे राज्यपालांना येथून तात्काळ हटवणं गरजेचं होतं. मात्र केंद्र सरकारने तसं केलं नाही. त्यांचा कार्यकाळ केंद्राने पूर्ण होऊ दिला आणि इतर राज्यांच्या राज्यपालांच्या बदल्यांसोबत कोश्यारी यांची बदली केली. त्यामुळे केंद्राने महाराष्ट्रावर आणि शिवप्रेमी जनतेवर फार उपकार केलेत असे मी मानत नाही.

    follow whatsapp