Gautam Adani यांच्या घरात लग्नीनघाई; ‘ही’ मुलगी होणार धाकटी सून

मुंबई तक

• 06:11 AM • 14 Mar 2023

Gautam adani son jeet : भारताचे प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदाणी यांच्या घरी पुन्हा सनई-चौघडे वाजणार आहेत. त्यांचा धाकटा मुलगा जीत अदाणी याचा साखरपुडा झाला आहे. रिपोर्टनुसार, (Diamond Merchant) हिरे व्यापाऱ्याची मुलगी दिवा जैमीन शाह (Diva Jaimin Shah) आता अदाणी कुटुंबात धाकटी सून म्हणून घरात प्रवेश करणार आहे. मात्र, लग्नाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. […]

Mumbaitak
follow google news

Gautam adani son jeet : भारताचे प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदाणी यांच्या घरी पुन्हा सनई-चौघडे वाजणार आहेत. त्यांचा धाकटा मुलगा जीत अदाणी याचा साखरपुडा झाला आहे. रिपोर्टनुसार, (Diamond Merchant) हिरे व्यापाऱ्याची मुलगी दिवा जैमीन शाह (Diva Jaimin Shah) आता अदाणी कुटुंबात धाकटी सून म्हणून घरात प्रवेश करणार आहे. मात्र, लग्नाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. (After Ambani, wedding work in Adani house; This will be the youngest daughter-in-law of the Adani family)

हे वाचलं का?

रविवारी 12 मार्च 2023 रोजी गौतम अदाणी यांचा मुलगा जीत अदाणी यांनी दिवा जमीन शाहसोबत एंगेजमेंट केली. गुजरातमधील अहमदाबादमध्ये एका खाजगी समारंभात एंगेजमेंट सोहळा पार पडला. यामध्ये दोन्ही कुटुंबातील जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. अदाणी यांची भावी सून दिवा जैमीन शाह सी. दिनेश अँड कंपनी. प्रा. लि.चे मालक जमिन शाह यांची मुलगी आहे.

जीत अदाणी बद्दल

गौतम अदाणी यांना दोन मुले आहेत. मोठ्या मुलाचे नाव करण अदाणीआणि धाकट्याचे नाव जीत अदाणी आहे. धाकटा मुलगा जीत अदाणी याचा जन्म 7 नोव्हेंबर 1997 रोजी झाला. जीत अदाणीयाने पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे. 2019 मध्ये जीत भारतात परतला. जीत अदाणी आणि त्याचा मोठा भाऊ करण या दोघांनीही परदेशातून ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. जीतनेही वडील आणि भावाप्रमाणे व्यवसाय हाताळण्यास सुरुवात केली आहे.

Mukesh Ambani आणि नीता अंबानी यांची रोमँटिक लव्हस्टोरी, ‘अशी’ झालेली पहिली भेट…

अदाणी ग्रुपचा व्यवसाय सांभाळतो जीत

जीत अदाणी हे 2019 सालापासून अदाणी समूहाशी संबंधित आहे आणि त्याच्या वडिलांचा व्यवसाय तो सांभाळत आहे. जीत अदाणीयाची 2022 मध्ये अदाणी समूहामध्ये उपाध्यक्ष (वित्त) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अदाणी समूहाचा देशात आणि जगात मोठा व्यवसाय आहे. या समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदाणी आहेत. अदाणी समूह मुख्यत्वे बंदरे, तेल आणि वायू उत्खनन, वीज निर्मिती, कोळसा व्यापार, गॅस वितरण आणि कोळसा खाण या व्यवसायात गुंतलेला आहे.

मोठा मुलगा करणचे 2013 मध्ये लग्न झाले

यापूर्वी, गौतम अदाणी यांचा मोठा मुलगा करणचा विवाह सुप्रसिद्ध कॉर्पोरेट वकील सिरिल श्रॉफ यांची मुलगी परिधी अदानीशी झाला होता. करण अदाणी आणि परिधी यांचा विवाह 2013 मध्ये झाला होता. दोघांच्या लग्नाला पीएम मोदीही पोहोचले होते.करण अदाणी सध्या अदाणीपोर्ट अँड SEZ लिमिटेड (APSEZ) चे सीईओ आहेत.

Gautam Adani यांच्यासाठी पत्नीने सोडली मोठी गोष्ट… कोण आहेत प्रीती अदाणी?

    follow whatsapp