MC Stan च्या विजयानंतर शिव आणि प्रियंकाचे चाहते बिग बॉसवर भडकले

मुंबई तक

13 Feb 2023 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:54 AM)

MC Stan Bigg Boss 16 Winner : 19 आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर देशातील सर्वात मोठ्या रिअॅलिटी शो (Bigg Boss) ला त्याचा विजेता मिळाला आहे. ‘बस्ती का हस्ती’ (Basti ka Hasti MC Stan) एमसी स्टॅनने बिग बॉस 16 ची ट्रॉफी जिंकली आहे (MC Stan Win Bigg Boss 16 Trophy). अंतिम फेरीत शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि प्रियांका चहर […]

Mumbaitak
follow google news

MC Stan Bigg Boss 16 Winner : 19 आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर देशातील सर्वात मोठ्या रिअॅलिटी शो (Bigg Boss) ला त्याचा विजेता मिळाला आहे. ‘बस्ती का हस्ती’ (Basti ka Hasti MC Stan) एमसी स्टॅनने बिग बॉस 16 ची ट्रॉफी जिंकली आहे (MC Stan Win Bigg Boss 16 Trophy). अंतिम फेरीत शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि प्रियांका चहर चौधरी (Priyanka Chahar Chaudhari) यांना पराभूत करून एमसी स्टॅन हा शो जिंकेल असे कोणालाही वाटले नव्हते. शिव ठाकरे विजेता होईस असं अनेकांना वाटत होतं मात्र रॅपरने गेम जिंकला म्हणून बरीच चर्चा झाली. नेहमीप्रमाणे, शोच्या फिनालेनंतर, सार्वजनिक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.स्टॅनच्या विजयामुळे अनेकजण हैराण झालेले आहेत. After MC Stan’s win, Shiv and Priyanka’s fans went Troll Bigg Boss

हे वाचलं का?

Bigg Boss 16 : पुणेकर MC Stan कसा घडला? ‘अस्तगफिरुल्ला’ने दिली कलाटणी

बिग बॉसला केलं जातंय ट्रोल

ट्रॉफी गमावल्याने प्रियांकाचे समर्थक निराश झाले आहेत. अभिनेत्रीच्या चाहत्यांचा राग एमसी स्टॅन आणि बिग बॉसच्या निर्मात्यांवर फुटत आहे. मात्र, हे फक्त प्रियांकाचे चाहतेच करतात असे नाही. सोशल मीडियावर बिग बॉसचे चाहतेही निर्मात्यांच्या या निर्णयावर नाराज आहेत. युजर्सनी बिग बॉसचे वर्णन फिक्स्ड आणि स्क्रिप्टेड म्हणून केले आहे. MC Stan विजेता झाल्यामुळे युजर्स निराश झाले आहेत.

लोक म्हणतात की ज्याने शोमध्ये काहीच केले नाही तो शोचा विजेता कसा बनला. लोकांचा असा विश्वास आहे की, स्टॅनचा विजेता बनल्याने सलमानही खूश नाही. त्यामुळेच फिनालेमध्ये दबंग खानने प्रियांकाचे कौतुक केले. एका यूजरने लिहिले, बिग बॉसच्या इतिहासातील अयोग्य विजेता. तर एकाने लिहिले, चार महिने कंटेंट देऊन काय उपयोग. शेम ऑन कलर्स टीव्ही

बिग बॉसचे चाहते का नाराज आहेत?

एका यूजरने लिहिले, सलमानने सुद्धा प्रियांका खरी विजेती असल्याचे म्हटले आहे. हे बिग बॉस पक्षपाती आहे. संपूर्ण सीझन हा शो पक्षपाती होता. असा सीझन जो कोणत्याही टास्कशिवाय टीआरपीमध्ये हाय राहिला. दुसर्‍याने लिहिले, हा विनोद आहे का? शोमध्ये शून्य सहभाग असलेली व्यक्ती, MC Stan हा शो जिंकला. प्रेक्षकांवर अन्याय झाला. शिव ठाकरे यांचा स्पष्ट विजय झाला. युजर्सने कलर्स टीव्हीला अन्यायकारक म्हटले आहे. नेटकऱ्यांनी टीआरपीसाठी शिव आणि प्रियांकाचा वापर केला, नंतर दुसऱ्याला विजेता बनवले, असे सांगितले.

MC Stan: पुण्यात रस्त्यावर राहिला, अल्ताफ तडवी कसा बनला स्टॅन, कोण बिग बॉस 16चा विजेता?

एमसी स्टॅनच्या फॅन्डमसमोर कोणी टीकू शकला नाही

बिग बॉस 16 मधील एमसी स्टॅनच्या विजयावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. पण काहीही झालं तरी एका गोष्टीकडे दुर्लक्ष करता येत नाही, ती म्हणजे त्याची फॅन फॉलोइंग. एमसी स्टॅनच्या जबरदस्त फॅन फॉलोइंगसमोर टीव्हीच्या चेहऱ्याचे स्टारडमही फिके पडले. जेव्हा जेव्हा एमसी स्टॅन नॉमिनेटेड झाला होता तेव्हा चाहत्यांनी त्याला प्रचंड मतांनी सुरक्षित केले. आता चाहत्यांनी मते देऊन स्टॅनला शोचा विजेता बनवले आहे. एक गोष्ट मान्य करावी लागेल, फॅन्डम असावा तर MC Stan सारखा.

    follow whatsapp