देशात कोरोना रूग्णांची संख्या वाढतेय. रूग्णसंख्या पुन्हा वाढू नये यासाठी राज्य सरकारने रविवारी कडक नियम जारी केलेत. यामध्ये रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी 7 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलीये. त्याचप्रमाणे या कडक निर्बंधांमध्ये चित्रपटगृह आणि नाट्यगृह बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे आता अनेक सिनेमांच्या रिलीज डेट पुढे ढकलण्यात येतायत.
ADVERTISEMENT
तर याचा फटका आता अभिनेत्री कंगना राणौतच्या सिनेमालाही बसलाय. कंगनाचा थलायवी हा सिनेमा 23 एप्रिल रोजी रिलीज होणार होता. मात्र आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.
यासंदर्भात थलायवी सिनेमाच्या टीमने निवेदन जारी केलंय. या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, थलायवी सिनेमाच्या ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. हा सिनेमा बऱ्याच भाषांमध्ये एकाचवेळी रिलीज करायचा आहे. पण सध्या कोरोनाची परिस्थिती पाहता 23 एप्रिल रोजी हा सिनेमा रिलीज करता येणार नाहीये. सरकारचे कडक नियम पाहता थलायवी सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात येत आहे.
तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारीत हा थलायवी सिनेमा आहे. हा चित्रपट एकाच वेळी वेगवेगळ्या 3 भाषांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. हिंदी, तेलुगु आणि तमिळ या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमासाठी अभिनेत्री कंगना राणौतने बरीच मेहनत घेतली आहे.
ADVERTISEMENT