मातीशी घट्ट नातं असलेले राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी मालेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर असताना चिंचावड गावातील शेतकऱ्याच्या शेतात पेरणी केली. गावाजवळून जात असताना मंत्री भुसे यांना शेतकरी पेरणीची तयारी करताना दिसून आले. त्यांनी तिकडे धाव घेऊन औत हातात घेतले आणि पेरणीला सुरुवात केली. राज्याचे कृषी मंत्री थेट शेतात येऊन पेरणी करताहेत हे पाहून परिसरातल्या शेतकऱ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का मिळाला.
ADVERTISEMENT
यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना मंत्री भुसे म्हणाले, जमिनीत पुरेशी ओल असेल तर पेरणी करा, शेतकऱ्यांना बियाणे, खते यांचा तुटवडा जाणवणार नाही याची खबरदारी शासनाने घेतल्याची ग्वाही कृषिमंत्र्यांनी यावेळी दिली.
सत्ताधारी-विरोधकांत एकमत, शेतकरी आंदोलनावर संसदेत चर्चा होणार
महाराष्ट्रात कोरोनाचं संकट असतानाही शेतकऱ्यांसाठीची आवश्यक त्या सगळ्या योजना सरकारने सुरू ठेवल्या आहेत. तसंच यावेळीही लॉकडाऊन लावत असताना महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी जे काही करता येईल ते केलं आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली त्यावेळी जे विषय मांडले त्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिक वीमा योजनेचा विषयही मांडला आहे. अशात आज दादा भुसे यांनी शेतामध्ये शेती करून पेरणी करून शेतकऱ्यांना एक प्रकारे आत्मविश्वासच देण्याचा प्रयत्न केला आहे.
काय म्हणाले दादा भुसे?
जमिनीत पुरेशी ओल असेल तर पेरणी करा, शेतकऱ्यांना बियाणे, खते यांचा तुटवडा जाणवणार नाही याची खबरदारी शासनाने घेतल्याची ग्वाही कृषिमंत्र्यांनी यावेळी दिली.
ADVERTISEMENT