अकोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभा भोजने यांचा राजीनामा

मुंबई तक

• 06:02 AM • 19 Jun 2021

राज्यातील वंचित बहुजन आघाडीची सत्ता असलेली अकोल्याची जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांनी राजीनामा दिला आहे. पक्षश्रेष्ठींच्या नाराजीचा सूर असल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांनी हा राजीनामा पक्ष संघटनेतील पदाधिकाऱ्यांकडे दिला आहे. पक्षश्रेष्ठी बाळासाहेब आंबेडकर हे जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत अनेक दिवसांपासून नाराज होते त्यामुळे पक्ष संघटनेने प्रतिभा भोजने यांना अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यास सांगितले […]

Mumbaitak
follow google news

राज्यातील वंचित बहुजन आघाडीची सत्ता असलेली अकोल्याची जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांनी राजीनामा दिला आहे. पक्षश्रेष्ठींच्या नाराजीचा सूर असल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांनी हा राजीनामा पक्ष संघटनेतील पदाधिकाऱ्यांकडे दिला आहे.

हे वाचलं का?

पक्षश्रेष्ठी बाळासाहेब आंबेडकर हे जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत अनेक दिवसांपासून नाराज होते त्यामुळे पक्ष संघटनेने प्रतिभा भोजने यांना अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यास सांगितले होते बाळासाहेब निर्णय घेईपर्यंत भोजने अध्यक्षपदी कायम राहतील असे असले तरी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर धैर्यवर्धन फुंडकर यांनी यांनी सांगितले की वंचित बहुजन आघाडी चा पक्ष संघटनेने जिल्हा परिषद अध्यक्ष यांचा राजीनामा मागितला होता.

पक्ष संघटनेच्या निर्णयाला मान देऊन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा पक्षाध्यक्षांकडे दिला आहे या राजीनाम्याच्या अंतिम निर्णय बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर घेतील असे त्यांनी सांगितलं आहे पण यातूनच जिल्हा परिषदेचं राजकारण आता काय वळण घेते कारण या राजीनाम्यानंतर पक्षांमध्ये हालचालींना वेग आला।

अशीही चर्चा आहे की या राजीनाम्यानंतर भाजपा पुन्हा किंगमेकरच्या भूमिकेत असू शकते कारण जानेवारी 2020 मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत कोणत्याच राजकीय पक्षाला बहुमत न मिळाल्याने सत्तास्थापनेसाठी प्रचंड रस्सीखेच झाली होती.

    follow whatsapp