काही महिन्यांपूर्वीच विवाहबद्ध झालेल्या बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांनी त्यांच्या चाहत्यांना गुड न्यूज दिलीये. आलिया भट्टने इन्स्टाग्रामवरून दोन फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत आलियाने लवकरच तिच्या घरात पाळणा हलणार असल्याचं सांगितलंय.
ADVERTISEMENT
अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरने त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिलाय. आलिया भट्टने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन फोटो शेअर केले आहेत. यातील एक फोटो हॉस्पिटलमधील आहे. तर दुसरा फोटो सिंहाच्या जोडीचा आहे.
आलिया भट्ट रुग्णालयात असून, डॉक्टर सोनोग्राफी करत असल्याचं फोटोमध्ये दिसत आहे. कम्प्युटरच्या स्क्रीनवर आलियाने हार्टचा इमोजी लावला आहे. सोनोग्राफीवेळी आलियाच्या बाजूला एक व्यक्ती बसलेली दिसत आहे.
आलियासोबतची ती व्यक्तीही कम्प्युटरच्या स्क्रीनकडे बघत असून, तो रणबीर असावा असं फोटोतून दिसतंय. दुसऱ्या फोटोमध्ये सिंह, सिंहणी आणि त्यांचा बछडा दिसत आहे. आलिया भट्टने फोटो शेअर करताना म्हटलं आहे की, लवकरच आमचं बाळ येत आहे.
आलिया झळकणार ‘वंडर वुमन’सोबत; Heart Of Stone मधून हॉलिवूडमध्ये पदार्पण
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी १४ एप्रिल रोजी लग्न केलं होतं. दोन महिन्यानंतरच आलिया रणबीरने गुड न्यूज दिली आहे. सेलिब्रेटींसह त्यांच्या चाहत्यांकडून अभिनंदन केलं जात आहे.
आलिया-रणबीर आईबाबा होणार असल्यानं भट्ट आणि कपूर कुटुंबाच्या आनंदाला पारावरच राहिलेला नाही. आलियाच्या पोस्टवर तिची आई सोनी राजदान आणि नणंद रिद्धीमानेही आनंद व्यक्त केला आहे.
आलिया भट्टने तिच्या आगामी सर्व प्रोजेक्टचं काम पूर्ण केलं आहे. हॉलिवूड प्रोजेक्टमधील कामही आलिया पुढील काही दिवसांत पूर्ण करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर आलिया भट्ट निर्माता म्हणून राहिलेले प्रोजेक्ट्सवरही काम करणार आहे.
रणबीर आणि आलियाचे न पाहिलेले फोटो तुम्ही पाहिलेत का?
ब्रह्मास्त्रमध्ये दिसणार रणबीर-आलिया
आलिया भट्ट-रणबीर कपूरने २०१८मध्ये एकमेकांना डेट करायला सुरूवात केली होती. त्यानंतर ब्रह्मास्त्रच्या सेटवरच त्यांचं रिलेशनशिप बाँडिंग वाढलं. तीन वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी एप्रिलमध्ये २०२२ मध्ये लग्न केलं.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा यांचा डेस्टिनेशन वेडिंगचा प्लान होता. मात्र, कोविडमुळे तो रद्द करावा लागला. त्यानंतर त्यांनी मुंबईतच १४ एप्रिल रोजी विवाह केला.
ब्रह्मास्त्रच्या निमित्ताने रणबीर कपूर आणि आलिया भट्ट पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. ब्रह्मास्त्र ९ सप्टेंबर २०२२ रोजी रिलीज होणार आहे. ब्रह्मास्त्रबरोबरच आलिया भट्ट राजा और रानी की प्रेम कहानी, हार्ट ऑफ स्टोन, डार्लिग्ज या सिनेमातही दिसणार आहे.
ADVERTISEMENT