हैदराबाद संध्या थिएटरबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुन पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाला आहे. पोलीस चौकशी आज अल्लू अर्जूनची चौकशी करणार आहेत. आपल्या वकिलांसोबत अल्लू अर्जून चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Suresh Dhas : "मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकी कुणीही बीडचं पालकमंत्रिपद...."; सुरेश धस यांचा मुंडेंना थेट विरोध?
अल्लू अर्जुनच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. यावेळी पोलिसांच्या हातात लाठ्या दिसल्या. 4 डिसेंबर रोजी हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर तिचा आठ वर्षांचा मुलगा जखमी झाला होता.
अल्लू अर्जुन चौकशीसाठी चिक्कडपल्ली पोलिस ठाण्यात पोहोचला आहे. चेंगराचेंगरीप्रकरणी एसीपी रमेश कुमार आणि डीसीपी सेंट्रल झोन अल्लू अर्जुनची चौकशी करणार आहेत.
हे ही वाचा >>Thane Crime News : काळ्या रंगाची साडी दिली नाही म्हणून, दुकानदारावर हल्ला, उल्हासनगरमध्ये काय घटना घडली?
याआधी रविवारी उस्मानिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी संध्या थिएटरमध्ये झालेल्या अपघाताबाबत अल्लू अर्जुनच्या घराबाहेर निदर्शनं केली होती. यावेळी संतप्त आंदोलकांनी अभिनेत्याच्या घरावर टोमॅटो फेकले आणि तोडफोडही केली होती.
आंदोलकांनी मृत महिलेच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत देण्याची मागणी केली होती. आंदोलकांनी आपल्या मागणीसाठी घराबाहेर ठेवलेल्या फुलांच्या कुंड्याही फोडल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरून 8 आंदोलकांना ताब्यात घेतले होते. हा कार्यक्रम झाला तेव्हा अभिनेता घरी उपस्थित नव्हता.
ADVERTISEMENT
