अमेरिकेतल्या खासदार प्रमिला जयपाल यांना फोनवरून धमकी देण्यात आली आहे. आपल्या देशात परत जा असं सांगत आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत प्रमिला जयपाल यांना धमकी देण्यात आली आहे. अमेरिकेतल्या एका अज्ञात व्यक्तीने फोनवरून ही धमकी आणि शिवीगाळ केली आहे. याशिवाय प्रमिला जयपाल यांना मायदेशी म्हणजेच भारतात परतण्याचा इशारा दिला आहे.
ADVERTISEMENT
काय आहे प्रकरण?
अमेरिकेतल्या भारतीय वंशाच्या खासदार प्रमिला जयपाल यांनी सोशल मीडियावर त्यांना जी धमकी देण्यात आली त्यासंदर्भातल्या पाच ऑडिओ क्लीप शेअर केल्या आहेत. या फोन क्लीपमध्ये एक अज्ञात व्यक्ती प्रमिला जयपाल यांना शिवीगाळ करत असल्याचं समोर आलं आहे तसंच त्यांना मायदेशी म्हणजेच भारतात परतण्याचा इशाराही या व्यक्तीने दिला आहे. प्रमिला जयपाल यांनी या फोन क्लीप्स सोशल केल्याने हे प्रकरण समोर आलं आहे. एवढंच नाही तर तुम्ही मायदेशी परतल्या नाहीत तर तुम्हाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असंही धमकी देण्याऱ्या व्यक्तीने म्हटलं आहे.
प्रमिला जयपाल यांनी काय म्हटलं आहे?
भारतीय वंशाच्या खासदार प्रमिला जयपाल यांनी ट्विट करत लिहिलं आहे की नेते नेहमीच त्यांच्यासंदर्भातला सुरक्षेचा धोका किंवा इतर तशा घटना जनतेपर्यंत पोहचू देत नाहीत. मात्र हिंसाचाराला कायमच सामान्या मानून आम्ही त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. या हिंसचाराच्या मुळाशी असलेला आणि त्याला प्रोत्साहन देणारा वर्णद्वेष आणि लिंगभेद हा आम्ही स्वीकारू शकत नाही अशा आशयाचं ट्विट प्रमिला जयपाल यांनी केलं आहे.
प्रमिला जयपाल यांचा जन्म भारतातल्या चेन्नईत झाला आहे. सध्या त्या अमेरिकेत खासदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांना आत मायदेशी परत जा हे सांगत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यात आली आहे. त्यांनी यासंदर्भातले ट्विट केले आहेत.
प्रमिला जयपाल यांना आधीही पिस्तूल दाखवून धमकी
अमेरिकेत यापूर्वीही एका अज्ञात व्यक्तीने भारतीय वंशाच्या अमेरिकन खासदार प्रमिला जयपाल यांना पिस्तुल दाखवून धमकावलं होतं. ब्रेट फोर्सेल या ४९ वर्षाच्या व्यक्तीने प्रमिला जयपाल यांना सिएटल येथील आमदार निवासस्थानाबाहेर पिस्तुल दाखवत प्रमिला जयपाल यांना धमकी दिली होती. या व्यक्तीने पिस्तुल दाखवत प्रमिला जयपाल आणि त्यांच्या पतीवर ओरडण्यास सुरूवात केली होती. ज्यानंतर या प्रकरणात ब्रेटला अटक करण्यात आली होती.
ADVERTISEMENT