Amravati MLC Election : धीरज लिंगाडेंनी ३० तासांनंतर उधळला गुलाल! भाजपला धक्का

मुंबई तक

03 Feb 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:06 AM)

Amravati MLC Election update : अमरावती : विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघातून (Amravati MLC) काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे (Dheeraj Lingade) यांनी विजय संपादन केला आहे. ३० तासांच्या प्रदीर्घ मतमोजणीनंतर लिंगाडेंनी गुलाल उधळला. भाजपचे उमेदवार आणि विद्यमान आमदार डॉ. रणजीत पाटील (Ranjeet Patil) यांचा त्यांनी तब्बल 3 हजार 382 मतांनी पराभव केला. दुसऱ्या फेरीअखेर लिंगाडेंना 46 […]

Mumbaitak
follow google news

Amravati MLC Election update :

हे वाचलं का?

अमरावती : विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघातून (Amravati MLC) काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे (Dheeraj Lingade) यांनी विजय संपादन केला आहे. ३० तासांच्या प्रदीर्घ मतमोजणीनंतर लिंगाडेंनी गुलाल उधळला. भाजपचे उमेदवार आणि विद्यमान आमदार डॉ. रणजीत पाटील (Ranjeet Patil) यांचा त्यांनी तब्बल 3 हजार 382 मतांनी पराभव केला. दुसऱ्या फेरीअखेर लिंगाडेंना 46 हजार 344 मतं तर पाटील यांना 42 हजार 962 मतं मिळाली. (Ranjeet Patils defeat, Dheeraj Lingade became a giant killer.)

गुरुवारी (२ फेब्रुवारी) सकाळी सुरु झालेल्या मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीपासूनच धीरज लिंगाडे यांनी आघाडी घेतली होती. ती त्यांनी दुसऱ्या फेरीअखेर कायम ठेवली. मात्र या निवडणुकीत बाद मतांचं प्रमाण लक्षणीय राहिलं. अमरावतीमध्ये तब्बल 8 हजार 735 बाद ठरली होती. मात्र डॉ. पाटील यांनी मतांच्या फेरमतमोजणीची मागणी केल्यानंतर यातील जवळपास 348 मतं वैध ठरली. यापैकी धीरज लिंगाडे यांना 177 मतं मिळाली. तर रणजीत पाटील यांना 145 मतं मिळाली.

Amravati MLC Election : रणजीत पाटलांचा ‘2’ आकड्याने केला घात; वाचा इनसाईड स्टोरी

बाद मतांमधील काही मतं वैध ठरल्याने विजयाचा कोटा वाढला. पण हा कोटा पूर्ण होत नसल्याने मतमोजणी लांबली होती. मात्र दुसऱ्या फेरीअखेर काँग्रेसच्या धीरज लिंगाडे यांनी 3 हजार 382 मतांची आघाडी घेत विजय मिळविला आहे. मतमोजणीदरम्यान, एक वेळ अशीही आली होती, जिथं वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारावर निकालाचं भवितव्य ठरणार होतं. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल अमलकर यांना 4 हजार 213 मतं मिळाली होती.

अमलकर यांच्या मतपत्रिकेवरील दुसऱ्या पसंती क्रमाच्या मतांची मोजणी सुरु असताना नेमकं कोण विजयी होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र अमलकरांच्या मतमोजणीतही लिंगाडे यांना सर्वाधिक मतं मिळाली. अमलकर यांची तब्बल 1 हजार 453 मतं लिंगाडे यांना तर रणजीत पाटील यांना145 मत मिळाली. अमलकरांची मतमोजणी संपल्यानंतर सर्वाधिक मतं मिळविलेल्या लिंगाडे यांना विजयी घोषित करण्यात आलं.

बाद मतांनी बिघडवलं पाटलांचं गणित?

अमरावतीमध्ये बाद मतांची संख्या लक्षणीय ठरली. तब्बल 8 हजार 735 बाद ठरली. मतमोजणी प्रक्रियेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सुत्रांना दिलेल्या माहितीनुसार याच बाद ठरलेल्या 8 हजार 735 मतांमध्ये जवळपास साडेपाच हजार मतं ही रणजीत पाटील यांची आहेत. या मतपत्रिकांवर केवळ ‘2’ हा आकडा लिहिला होता. नियमानुसार ‘1’ हा आकडा लिहिणं अपेक्षित होतं. मात्र ‘1’ असा पसंतीक्रमच कोणाच्याही नावापुढे नव्हता. त्यामुळे या मतपत्रिका बाद ठरविण्यात आल्या.

Nagpur MLC election : फडणवीसांच्या ‘त्या’ व्हीडिओमुळे गाणार यांचा पराभव?

धीरज लिंगाडे १३ वर्षांनी रणजीत पाटलांच्या भूमिकेत :

अमरावती पदवीधर मतदारसंघ अभ्यासू आमदार प्रा. बी.टी. देशमुख यांचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. बी. टी. देशमुख इथून तब्बल सहावेळा विजयी झाले. मात्र, २०१० मध्ये बी.टी. देशमुखांना हरवत डॉ. रणजीत पाटील ‘जायंट किलर’ ठरले होते. २०१० आणि २०१६ अशा सलग दोन टर्म रणजीत पाटलांनी अमरावतीचं मैदान मारलं. मात्र, आता तिसऱ्यांदा मैदानात उतरलेल्या पाटील यांना नवख्या लिंगाडे यांनी पाणी पाजलं आहे.

    follow whatsapp