ADVERTISEMENT
देशभरात सध्या श्रीकृष्ण जन्म आणि दहीहंडीच्या सणामुळे सर्वत्र मंगलमय वातावरण आहे.
सध्या या सणावर कोरोनाचं सावट असलं तरीही स्थानिक पातळीवर कृष्ण मंदिरात विधिवत पुजा होताना दिसत आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी स्थानिक ISCON मंदीरात जाऊन श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं.
यावेळी नवनीत राणा यांच्या हस्ते बाळकृष्णाच्या मूर्तीवर विधिवत अभिषेक करण्यात आला.
यानंतर खासदार राणा यांच्या हस्ते ISCON मंदीरात आरती पार पडली.
ISCON मंदीरातील स्थानिक पुजाऱ्यांनी खासदार नवनीत राणांचा श्रीकृष्णाची मूर्ती देऊन सत्कार केला.
ADVERTISEMENT