अमरावतीत पोलिसांसाठी गेल्या काही महिन्यांपासून डोकेदुखी ठरत असलेल्या चेन स्नॅचिंग करणाऱ्या तिघांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या टोळीच्या नावावर ११ गुन्हे दाखल असून त्यांनी चोरलेला माल कुठे विकला याचा तपास आता पोलीस अधिकारी घेत आहेत.
ADVERTISEMENT
गाडगेनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी मंगळवारी संध्याकाळी गस्तीवर असताना पॅराजाईज कॉलनीत दोन बाईकस्वार संशयास्पदरित्या आढळले. पोलिसांनी संशयावरुन या दोघांना ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केली. चौकशीदरम्यान पोलीस खाक्यासमोर या दोन्ही बाईकस्वारांनी आपला गुन्हा कबूल केला.
पंढरपूर: लाखो रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यावर डल्ला, सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात
यानंतर दोघांनीही दिलेल्या माहितीच्या आधारावर या टोळीतील तिसऱ्या व्यक्तीलाही पोलिसांनी अटक केली. चेन स्नॅचिंग दरम्यान ही टोळी खास पद्धत वापरायची. गाडी चालवणारा व्यक्ती हा डोक्यावर पूर्णपणे हेल्मेट घालून चेहरा झाकायचा. तर पाठीमागे बसणारा व्यक्ती हा गळ्यात ओढणी घालून बसायचा. तसेच नंबरप्लेट ओळखीला येऊ नये म्हणून हे आरोपी त्यावर चिखल लावून ठेवायचे.
डोंबिवली: बायकोसोबत मौजमजा करण्यासाठी पैसे पडायचे कमी, लाड पुरविण्यासाठी तरुण चोरायचा बाइक
सराफा बाजारात ज्या सोनाराकडे त्यांनी हा माल विकला त्या सोनारालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आतापर्यंत लुटलेला मुद्देमाल मिळवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत.
ADVERTISEMENT