Andheri East Bypoll Election महाराष्ट्र विधानसभेच्या 166-अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या एका जागेसाठी २५ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रं निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांच्याकडे दाखल केली आहेत. मात्र मुख्य लढत आहे ती भाजपचे मुरजी पटेल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्यातच. आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली. त्यानंतर शिवसेनेत भूकंप होऊन दोन गट पडले. उद्धव ठाकरे गटाने ऋतुजा लटकेंना या ठिकाणाहून उमेदवारी दिली आहे. ऋतुजा लटके या दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी आहेत.
ADVERTISEMENT
कुणी कुणी भरला आहे अर्ज?
मुरजी पटेल (भारतीय जनता पार्टी)(भारतीय जनता पार्टी), ऋतुजा लटके (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), निखिलकुमार ठक्कर (अपक्ष), चंद्रकांत मोटे (अपक्ष), संदेश जाधव (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया), मनोज नायक (राईट टू रिकॉल), अर्जुन मुरडकर (अपक्ष), आकाश नायक (भारत जनाधार पार्टी), मल्लिकार्जुन पुजारी (महाराष्ट्र विकास आघाडी), चंदन चतुर्वेदी (उत्तर भारतीय विकास सेना), राजेश त्रिपाठी (उत्तर भारतीय विकास सेना), संदीप नाईक (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), निकोलस अलोदा (अपक्ष), साकिब नफुर इमाम मलिक (ऑल इंडिया महिला एम्पॉवरमेंट पार्टी), श्रीमती फर्झाना सिराज सय्यद (ऑल इंडिया महिला एम्पॉवरमेंट पार्टी), अंकुशराव पाटील (राष्ट्रीय मराठा पार्टी/अपक्ष), बाळा विनायक (आपली अपनी पार्टी), वाहिद खान (अपक्ष) आणि निर्मल नागबतूला (अपक्ष), राकेश विश्वनाथ अरोरा (क्रांतिकारी जय हिंद सेना) आणि (हिंदुस्तान जनता पार्टी), मिलिंद काशिनाथ कांबळे (अपक्ष) आणि श्रीमती नीना गणपत खेडेकर (अपक्ष). या २५ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.
अर्ज दाखल करण्यासाठी १४ ऑक्टोबर ही शेवटची तारीख
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटची तारीख १४ ऑक्टोबर होती. १६६-अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या एका जागेसाठी २५ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांच्याकडे दाखल केली आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या गटाने सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सावध पवित्रा घेत आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ऋतुजा लटके यांच्यासोबतच संदीप नाईक यांनीही उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे. २५ पैकी आठ अपक्ष उमेदवार आहे. तर उर्वरित उमेदवार हे छोट्या संघटना, पक्षाचे आहेत.
ADVERTISEMENT