Nashik Bus Fire : अपघाताबाबत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक, मृतांच्या वारसांना २ लाखांची मदत

मुंबई तक

• 04:52 AM • 08 Oct 2022

प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक नाशिकमध्ये झालेल्या बस अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घनटेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांविषयी मला सहवेदना वाटते आहे. त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तसंच या अपघातात जे जखमी झाले आहेत त्यांना लवकर […]

Mumbaitak
follow google news

प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक

हे वाचलं का?

नाशिकमध्ये झालेल्या बस अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घनटेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांविषयी मला सहवेदना वाटते आहे. त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तसंच या अपघातात जे जखमी झाले आहेत त्यांना लवकर आराम मिळो अशी प्रार्थना मी देवाच्या चरणी करतो या आशयाचं ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसंच मृतांच्या वारसांना २ लाख रूपयांची मदतही केंद्राकडून जाहीर करण्यात आली आहे.

नेमकी काय घडली घटना?

यवतमाळहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसला नाशिक जवळ भीषण अपघात झाला. ही खासगी बस चिंतामणी ट्रॅव्हल्सची होती असं समजतं आहे. धुळ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेलरची बसला धडक लागली त्यानंतर या बसने पेट घेतला. ही खासगी बस यवतमाळहून मुंबईच्या दिशेने चालली होती. या बस अपघातात ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेतील जखमींना अग्नीशमन दलाकडून शासकीय रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. या अपघातात ३८ जण जखमी झाले आहेत.

नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर झाला अपघात

नाशिक औरंगाबाद रस्त्यावर ही घटना घडली आहे. नाशिक औरंगाबाद रस्त्यावरच्या हॉटेल मिरची चौकात ही घटना आज पहाटे घडली. पहाटे ४.३० च्या सुमाराला ही घटना घडली आहे. अपघात इतका भीषण होता की संपूर्ण बस जळून खाक झाली आहे.

DCP अमोल तांबे यांनी काय माहिती दिली?

आज पहाटे नाशिकमधल्या मिरची चौकात एक ट्रॅव्हल बस आणि ट्रेलर यांचा अपघात झाला आहे. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला. ३८ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलीस, अग्नीशमन दलाचं पथक हे सगळं घटनास्थळी आलं आहे. हा अपघात नेमका कसा झाला आणि अपघातानंतर बसला आग कशी लागली याची माहिती आम्ही घेत आहोत असंही डीसीपी अमोल तांबे यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही व्यक्त केला शोक

या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला झाला. या घटनेबाबत जिल्हाधिकाऱ्यांसह आयुक्तांशी माझं बोलणं झालं आहे या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३८ जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. सर्व जखमींवर चांगले उपचार झाले पाहिजे अशाही सूचना देण्यात आल्या आहेत असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसंच अपघातात मृत्यू झालेल्यांच्या वारसांना पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

    follow whatsapp