गेल्या वर्षभरापासून तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर दिलासा मिळाला आहे. ईडीच्या मनी लॉड्रिंग प्रकरणात जामीन मिळूनही तुरूंगात असलेल्या अनिल देशमुखांना सीबीआय प्रकरणात उच्च न्यायालयात मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांचा जामीन मंजूर केला असला, तरी त्यांना 10 दिवस तुरूंगातच राहावं लागणार आहे.
ADVERTISEMENT
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचे आरोप केलेले आहेत. याप्रकरणात ईडीने मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिल देशमुख सहा महिन्यांपर्यंत यंत्रणांच्या समोर आले नव्हते.
अनिल देशमुख-सचिन वाझे कनेक्शनबद्दल ईडीच्या आरोपपत्रात काय म्हटलंय?
2 नोव्हेंबर 2021 रोजी अनिल देशमुख ईडी चौकशीसाठी समोर आले. अनिल देशमुख यांची ईडीकडून 12 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. 2 नोव्हेंबर 2021 पासून तुरूंगात असलेल्या अनिल देशमुख यांनी जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना ईडीच्या प्रकरणात जामीन दिलेला आहे.
अनिल देशमुख बाहेर येणार की तुरूंगातच राहणार?
मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना जामीन मंजूर केला आहे. मात्र, सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात जाण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे जामीनाच्या आदेशाला 10 दिवसांची स्थगिती देण्यात आली असून, सीबीआय सर्वोच्च न्यायालयात निर्णयाला आव्हान देणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच अनिल देशमुख बाहेर येणार की तुरुंगातच राहणार हे स्पष्ट होणार आहे.
परमबीर सिंगच अँटेलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचे मास्टरमाईंड-अनिल देशमुख
अॅण्टेलिया स्फोटकं प्रकरणानंतर अनिल देशमुख यांच्यावर आरोपांच्या फैरी सुरू झाल्या होत्या. सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर मुंबईचे तत्कालिन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली होती. बदली करण्यात आल्यानंतर त्यांनी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. बार चालकांकडून वसूली, पोलीस अधिकाऱ्यांकडून बदलीसाठी पैसे आदी आरोप परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर केलेले आहेत.
ADVERTISEMENT