योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर
ADVERTISEMENT
नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेले अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठीचे आरक्षण कायम ठेवत उर्वरित जागांवर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग,नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला अशा जागांसाठी शुक्रवारी सोडते द्वारे आरक्षण निश्चित करण्यात आलं.
नागपूर महापालिकेतील आरक्षण सोडतीचा दिग्गजांना फटका
माजी उपमहापौर सतीश होले,माजी महापौर किशोर डोरले,हरीश ग्वालबन्सी यांच्या सह माजी नगरसेवकांना या आरक्षणाचा फटका बसला. तर माजी महापौर दयाशंकर तिवारी, संदीप जोशी,माजी सत्ता पक्षनेते अविनाश ठाकरे,माजी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रकाश भोयर यांचे प्रभाग सुरक्षित ठेवण्यात आले आहे.
माजी उपमहापौर सतीश होले यांच्या प्रभाग क्रमांक 33 मधील एक जागा अनुसूचित जाती आणि दोन जागा महिलांसाठी राखीव झाल्याने होले यांची अडचण निर्माण झाली आहे. आता ते प्रभाग 46 मधून लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
माजी महापौराचा प्रभाग महिलांसाठी राखीव
माजी महापौर किशोर डोरले यांच्या प्रभाग आठ मधून निवडणुकीची तयारी केली होती मात्र या प्रभागात एक जागा अनुसूचित जमाती आणि दोन जागा महिलांसाठी राखीव झाले आहे ते आता प्रभाग 10 मधून लढतील अशी शक्यता आहे. हरीश गालबंशी यांच्या 20 नंबर प्रभाग मधील एक जागा अनुसूचित जमाती व दोन जागा महिलांसाठी राखीव झाल्याने ते आता बाजूच्या प्रभागातून लढणार आहेत.
इतर काही माजी नगरसेवकांची सुद्धा अशीच अडचण निर्माण झाली आहे. माजी महापौर दयाशंकर तिवारी यांचा प्रभाग क्रमांक 23 मात्र सुरक्षित आहे. या प्रभागात एक जागा सर्वसाधारण तर एक ओबीसी साठी राखीव झाल्याने तिवारी यांना अडचण नाही. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रकाश भोयर यांना प्रभाग 42 म्हणून लढण्यास पुन्हा संधी आहे. माजी महापौर संदीप जोशी आणि देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय यांनाही प्रभाग 40 मधून लढण्यास संधी आहे.
माजी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांना प्रभाग 30 मधून लढण्याची पुन्हा संधी आहे. माजी शिक्षण सभापती दिलीप दिवे यांचाही प्रभाग 41 हा सुरक्षित आहे. तसेच काँग्रेस नेते प्रफुल गुडधे,भाजप नेते अविनाश ठाकरे यांना सुद्धा पुन्हा लढण्याची संधी आहे.
प्रभागांची एकूण संख्या – 52
नगरसेवकांची एकूण संख्या- 156
महिला आरक्षण- 78
संवर्ग आणि एकूण जागा
अनुसूचित जाती- 1
अनुसूचित जमाती- 12
नागरिकांचा मागास प्रवर्ग- 35
सर्वसाधारण- 78
एकूण- 156
महिलांसाठी राखीव
अनुसूचित जाती- 16
अनुसूचित जमाती- 6
नागरिकांचा मागास प्रवर्ग- 18
सर्वसाधारण- 38
एकूण- 78
ADVERTISEMENT