आज महाराष्ट्रात ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे आणखी 11 रूग्ण आढळले आहेत. यापैकी 8 रूग्ण मुंबई विमानतळावरील तपासणीमध्ये तर एक रूग्ण पिंपरी चिंचवड, एक रूग्ण उस्मानाबाद आणि एक रूग्ण नवी मुंबईत आढळला आहे. नवी मुंबईत ओमिक्रॉनचा शिरकाव होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
ADVERTISEMENT
ओमिक्रॉन व्हेरिएंटचे 65 रूग्ण कुठे कुठे आहेत?
मुंबई – 30
पिंपरी-12
पुणे ग्रामीण- 7
पुणे महापालिका-3
सातारा- 3
उस्मानाबाद- 3
कल्याण डोंबिवली- 2
बुलढाणा-1
नागपूर-1
लातूर-1
वसई विरार-1
नवी मुंबई -1
एकूण-65
यापैकी 34 रूग्णांना त्यांची RTPCR चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडण्यात आलं आहे.
Coronavirus Updates : डेल्टापेक्षा वेगाने पसरतोय ओमिक्रॉन, WHO ची माहिती
आज आढळलेल्या 11 ओमिक्रॉन रूग्णांची माहिती-
11 पैकी 8 रूग्ण मुंबईत आढळले. हे रूग्ण विमानतळावरील सर्वेक्षणात आढळले आहेत. यातील प्रत्येकी एक रूग्ण अनुक्रमे केरळ, गुजरात आणि ठाणे येथील आहे. तर इतर पाच रूग्ण मुंबईतले आहेत. या आठ जणांमध्ये 18 वर्षांखालील दोन मुलांचा समावेश आहे. युगांडा मार्गे दुबई असा प्रवास केलेले आणि मुंबईत पोहचलेले दोन जण आहेत. तर इंग्लंडहून मुंबईला आलेले चार जण आहेत. दुबईहून मुंबईत आलेले दोन जण आहेत. हे सर्व रूग्ण लक्षणेविरहीत ते सौम्य गटातले आहेत.
उस्मानाबाद या ठिकाणी आधी ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या एका रूग्णाच्या शेजारची 13 वर्षांची मुलगी ओमिक्रॉन बाधित आढळली आहे. तिला कोणतीही लक्षणं नाहीत.
केनियाहून हैदराबाद मार्गे आलेला नवी मुंबईतील एक रूग्ण ओमिक्रॉन बाधित आहे. हा 19 वर्षांचा तरूण आहे, त्याने लसीचे दोन डोस घेतले आहेत. मात्र कोरोनाची कोणतीही लक्षणं त्याला नाहीत.
या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ५८८ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ७७ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
भारतातील सोमवारपर्यंतची नेमकी स्थिती काय? (India Omicron cases)
भारतातील 12 राज्यांमध्ये आतापर्यंत Omicron चे 161 रुग्ण आढळले आहेत. मात्र, यापैकी एकाही रुग्णाची प्रकृती गंभीर नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर एकूण 42 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यनिहाय बोलायचे झाल्यास, महाराष्ट्र- 54, दिल्ली-32, तेलंगणा- 20, राजस्थान-17, गुजरात- 13, केरळ-11, कर्नाटक-8, उत्तर प्रदेशात 2 आणि तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये आणि चंदीगडमध्ये प्रत्येकी एक-एक केस आहे.
ADVERTISEMENT