अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. अर्जुन कपूरने मलायका सोबत असलेलं त्याचं नातं उघडही केलं आहे. अर्जुन कपूर सावलीसारखा मलायकासोबत असतो. तसंच तो तिच्यावर जीव ओवाळून टाकतो तरीही या दोघांचं लग्न का होत नाही हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. आता त्याचं उत्तरच समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
मलायका आणि अर्जुन कपूर लग्न का करत नाहीत?
अर्जुन कपूर करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये पाहुणा म्हणून आला होता. अर्जुनने या शोमध्ये मलायकासोबत असलेल्या त्याच्या नात्याविषयी खुलून बोलणं पसंत केलं. अशात तुम्ही दोघं लग्न कधी करणार असा प्रश्न जेव्हा करणने अर्जुन कपूरला विचारला तेव्हा अर्जुन म्हणाला तूर्तास तरी लग्न करायचा आमचा विचार नाही.
अर्जुन कपूरने काय म्हटलं आहे मलायकासोबत लग्नाविषयी?
अर्जुन कपूर म्हणतो, “मी अगदी इमानदारीने सांगतो आहे की दोन वर्षे लॉकडाऊनमध्ये गेली आहेत. आता मी माझ्या करिअरवर फोकस करू इच्छितो. मी कुठपर्यंत पोहचतो ते मला बघायचं आहे. मी वास्तवदर्शी माणूस आहे. मला कुणापासून काही लपवायचं नाही. मी आर्थिक दृष्ट्या स्थैर्य येईल याबाबत बोलत नाही. पण मी प्रोफेशनली जास्त स्टेबल होऊ इच्छितो. मी असं काम करू इच्छितो ज्यातून मला आनंद मिळेल. मी आनंदी राहिलो तर माझा पार्टनर आनंदी होऊ शकेल. मला सर्वात जास्त आनंद काम करण्यातून मिळतो.” असं अर्जुन कपूरने म्हटलं आहे.
पाहा मलायकाच्या बिकिनी फोटोवर अर्जुन कपूर काय म्हणाला
अर्जुन कपूरला मिळाला कुटुंबाचा पाठिंबा
अर्जुन कपूरचं म्हणणं हे पण आहे की माझं आणि मलायकाचं नातं माझ्या कुटुंबाने स्वीकारलं आहे. आमच्या नात्याला त्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या नात्यात काहीही चुकीचं नाही. तसंच तुम्ही याबाबत फार विचार करू नका. अर्जुन कपूरच्या म्हणण्यानुसार मलायका आणि तो इतक्यात लग्न करण्याची तयारी करत नाहीत. अर्जुन आणि मलायका सध्या लग्नाचा विचार करत नाहीत हे आता स्पष्ट जालं आहे. मात्र या दोघांचे चाहते त्यांना विवाह बंधनात अडकलेले पाहून इच्छित आहेत. आता चाहत्यांना हे खुशखबर देणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.
ADVERTISEMENT