पुणे: भीमा-कोरेगाव प्रकरणात (Bhima Koregaon Case) अमेरिकेतील डिजिटल फॉरेन्सिक फर्म आर्सेनल कन्सल्टिंगने (Arsenal Consulting) आता आणखी एक मोठा दावा केला आहे. फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये आपला पहिला आणि दुसरा अहवाल प्रसिद्ध करणार्या कंपनीने आता तिसरा अहवाल जारी केला आहे.
ADVERTISEMENT
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मानवाधिकार कार्यकर्ता सुरेंद्र गडलिंग यांच्या कम्प्युटरसोबत छेडछाड केली गेल्याचं आणि पुरावे प्लांट करण्यात आल्याची धक्कादायक माहिती अहवाल देण्यात आली आहे.
आर्सेनल कन्सल्टिंगच्या अहवालानुसार, 2018 साली सुरेंद्र गडलिंग यांच्या अटकेच्या दोन वर्षापूर्वी ई-मेलद्वारे त्यांच्या कम्प्युटरसोबत छेडछाड करण्यात आली होती.
या ई-मेलचा रिसीव्हर फक्त सुरेंद्र गडलिंग यांना नव्हे तर स्टॅन स्वामी यांच्यासारखे इतर कार्यकर्तांना देखील पाठविण्यात आले होते. अशावेळी अशीही भीती व्यक्त केली जात आहे की, स्टॅन स्वामी आणि इतर लोकांच्या कम्प्युटरमध्ये छेडछाड करण्यात आली असावी.
अटक केलेल्या इतर कार्यकर्त्यांप्रमाणेच स्टेन स्वामी यांनीही आपल्या जामीन याचिकेत वारंवार सांगितले होते की, हिंसा भडकवण्याचे किंवा नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे जे आरोप लावण्यात आले आहेत ते बनावट आहेत. तसेच पुराव्यांसह छेडछाड करण्यात आली आहे. आपल्या मुलाखतीतही स्टॅन स्वामी यांनी कम्प्युटरमध्ये पुरावे प्लांट करण्यात आल्याचं म्हटलं होतं.
त्याचबरोबर NIAचे म्हणणे आहे की, स्टॅन स्वामी यांच्यासह 16 जणांनी भीमा-कोरेगाव दंगल भडकवण्याचा कट रचला होता आणि हिंसाचाराला ते जबाबदार होते. या सर्व आरोपींमध्ये स्टेन स्वामी हे सर्वात वयस्कर होते. त्यांच्यावर UAPA लावण्यात आला होता. यासह पंतप्रधान मोदींची हत्या करण्याचा कट रचल्याच्या प्रकरणातही त्यांना आरोपी बनविण्यात आले होते.
दरम्यान, आर्सेनलच्या अहवालानुसार, सुरेंद्र गडलिंग यांच्या हार्ड ड्राईव्हच्या अॅनालिसेसमधून पुरावे प्लांट केले असल्याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. अहवालात या गोष्टीकडे लक्ष वेधण्यात आलं आहे की, आर्सेनलने आतापर्यंत जे तपास केले आहेत त्यातील पुराव्यांमधील छेडछाडीचे हे सर्वात गंभीर प्रकरण आहे.
आर्सेनलच्या रिपोर्टमध्ये नेमकं काय म्हटलं आहे?
फेब्रुवारी 2016 ते नोव्हेंबर 2016 आणि नोव्हेंबर 2017 दरम्यान 20 महिन्यांपर्यंत सुरेंद्र गडलिंगच्या कम्प्युटरशी छेडछाड केल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. या वेळी किमान 14 आक्षेपार्ह लेटर प्लांट करण्यात आले होते. हा तोच अटॅकर आहे ज्याने रोना विल्सनच्या कम्प्युटरला लक्ष्य केले होते आणि 30 फाईल्स प्लांट केल्या होत्या.
हा अॅटकर सुरेंद्र गडलिंगच्या कम्प्युटरवर नजर ठेवणे आणि पुरावे प्लांट करण्यात सक्रीय असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान सुरेंद्र गडलिंग गेली तीन वर्षे तुरूंगात होता.
रोना विल्सन आणि सुरेंद्र गडलिंग यांच्या अटकेच्या वेळी पोलिसांनी त्यांचे संगणक जप्त केले होते. याची इलेक्ट्रॉनिक प्रतही वकिलांना देण्यात आली होती. वकिलांनी ही प्रत विश्लेषणासाठी आर्सेनल कन्सल्टिंगला दिली होती.
एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी स्टॅन स्वामी यांचं निधन
दरम्यान, सुरेंद्र गडलिंग यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाला विनंती केली की, पुढील महिन्यात त्यांच्या आईच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त काही धार्मिक विधींमध्ये भाग घेण्यासाठी त्यांना तात्पुरता जामीन मिळावा. दरम्यान, याप्रकरणाची सुनावणी 22 जुलै रोजी होणार आहे.
ADVERTISEMENT