अभिनेता शाहरुख खानच्या मुलाला म्हणजेच आर्यन खानला आजही दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. बुधवारी बॉम्बे हायकोर्टात आर्यनच्या जामिनावर सुनावणी झाली. तसंच मंगळवारीही झाली. न्यायालयाने आता उद्या दुपारी अडीच वाजता सुनावणी होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. 26 आणि 27 ऑक्टोबर असे सलग दोन दिवस त्याच्या जामिनावर सुनावणी झाली. मात्र आर्यन खानला दिलासा मिळू शकलेला नाही. येत्या दोन दिवसात आर्यन खानला जामीन मिळाला नाही तर त्याची दिवाळी तुरुंगातच जाणार आहे.
ADVERTISEMENT
येत्या दोन दिवसात म्हणजेच 28 आणि 29 ऑक्टोबरला जर आर्यन खानला जामीन मिळू शकला नाही तर त्याच्या अडचणी वाढणार आहेत. कारण आर्यनची दिवाळी तुरुंगात जाणार आहे. 29 तारखेनंतर कोर्टाचा ब्रेक सुरू होईल. कोर्टाला दिवाळीच्या सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे पुढच्या सोळा रात्री आर्यन खानला तुरुंगात काढाव्या लागणार आहेत.
बॉम्बे हायकोर्टाला 29 ऑक्टोबरनंतर दिवाळीची सुट्टी लागणार आहे. कोर्टाने दिवाळीच्या सुट्टीच्या आधी आर्यनच्या जामिनावर निर्णय दिला तर तर ठिक नाहीतर सोळा दिवस म्हणजेच 15 नोव्हेंबरपर्यंत शाहरुखच्या लाडक्या आर्यनला तुरुंगातच रहावं लागणार आहे.
बॉम्बे हायकोर्टाला दिवाळीची सुट्टी लागली आहे. 1 ते 12 नोव्हेंबरपर्यंत ही सुट्टी असणार आहे. 13 आणि 14 नोव्हेंबरला शनिवार आणि रविवार आहे. दिवाळीची सुट्टी लागण्याआधी म्हणजेच 30 आणि 31 ऑक्टोबरला शनिवार आणि रविवार आहेत त्यामुळे या दोन दिवशीही कोर्टाचं कामकाज होणार नाही. आर्यन खान मागच्या 21 दिवसांपासून आर्थर रोड तुरुंगात आहे. सेशन्स कोर्टाने तीनवेळा आर्यन खानचा जामीन नाकारला आहे. आर्यन खानचे वकील आणि त्याचे कुटुंबीय या सगळ्यांना आता बॉम्बे हायकोर्टाकडून बऱ्याच आशा आहेत. ड्रग्ज केसमध्ये मंगळवारी दोन आरोपींना जामीन मिळाला आहे. त्यामुळे शाहरुख आणि कुटुंबीयांच्या आर्यनला जामीन मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
आर्यनला आज दिलासा नाही
आर्यन खान प्रकरणात मंगळवारी सुरु झालेली या प्रकरणाची सुनावणी आजही पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे आजची रात्र देखील आर्यनला तुरुंगातच घालवावी लागणार आहे. सुनावणी पूर्ण होऊ न शकल्याने आता उर्वरित सुनावणी ही उद्या (गुरुवार) होणार आहे.
गुरुवारी दुपारी अडीच वाजेनंतर हायकोर्टात पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. जोवर या प्रकरणात आर्यन खानला जामीन मिळत नाही तोवर त्याला तुरुंगातच राहावं लागणार आहे. त्यामुळे आर्यनला लवकरात लवकर जामीन मिळावा यासाठी त्याचे वकील प्रयत्न करत आहे.
ADVERTISEMENT