मुख्यमंत्री म्हणून फडणवीसच आषाढीला विठ्ठलाची पूजा करणार; भाजप खासदाराचा गोप्यस्फोट

मुंबई तक

• 08:52 AM • 28 Jun 2022

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. महाविकास आघाडी सरकार पडण्याच्या मार्गावर आले. शिवसेनेच्या जवळपास ४० आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणत आहेत. सुप्रीम कोर्टाने काल झालेल्या सुनावणीनीमध्ये बंडखोर आमदारांना १२ जुलैपर्यंत अभय दिले आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज सकाळीच अमित शहांच्या भेटीला दिल्लीमध्ये रवाना झाले आहेत. […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. महाविकास आघाडी सरकार पडण्याच्या मार्गावर आले. शिवसेनेच्या जवळपास ४० आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणत आहेत. सुप्रीम कोर्टाने काल झालेल्या सुनावणीनीमध्ये बंडखोर आमदारांना १२ जुलैपर्यंत अभय दिले आहे.

हे वाचलं का?

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज सकाळीच अमित शहांच्या भेटीला दिल्लीमध्ये रवाना झाले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रातील राजकारण दिल्लीतून चालवलं जाणार का? अशी चर्चा आहे. यादरम्यान भाजपच्या एका खासदाराने मोठे वक्तव्य केले आहे. आषाढी एकादशीला देवेंद्र फडणवीसच विठ्ठलाची पुजा करणार आहेत, असे वक्तव्य खासदारांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु झाली आहे.

येत्या दोन-तीन दिवसांत भाजपाचे सरकार स्थापन होईल. तसेच आषाढी एकादशीची महापूजा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडेल असा मोठा गोप्यस्फोट खासदार चिखलीकरांना केला आहे. ज्यावेळी भाजपचे सरकार स्थापन होईल तेव्हा शिवसेनेचे १० ते १२ खासदार आमच्यासोबत येतील असेही चिखलीकर म्हणाले आहेत.

विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सकाळीच दिल्लीला रवाना झाले आहेत, तिथे ते भाजपच्या वरिष्ठांशी चर्चा करणार आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाची दुपारी बैठक होणार आहे. बैठकीमध्ये काय चर्चा होईल हे माध्यमांसमोर पोहोचवले जाईल असे एकनाथ शिंदे यांनी स्वत: सांगितले आहे. दीपक केसरकर हे एकनाथ शिंदे गटाचे अधिकृत प्रवक्ते आहेत, ते सर्व माहिती माध्यमांपर्यंत पोहोचवतील असे शिंदे म्हणाले आहेत.

दरम्यान गुवाहाटीत आलेले कोणते आमदार तुमच्या संपर्कात आहेत ते सांगावं. कारण असं काहीही नाही. आम्ही सगळे एक आहोत असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी आज रॅडिसन ब्लू हॉटेलच्या बाहेर पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. जर उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात कुणी असेल तर त्यांनी नावं सांगावीत असं थेट आव्हान एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.

लवकरच आम्ही मुंबईत परतणार आहोत असं शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी सांगतिलं आहे. आज आसाममधल्या गुवाहाटीच्या रॅडिसन ब्लू हॉटेलच्या बाहेर आले होते. कडेकोट पोलीस बंदोबस्तात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दीपक केसरकर हे आमच्या गटाचे प्रवक्ते आहेत ते तुम्हाला सगळी माहिती देतील. स्वतःचा स्वार्थ साधून राजकारण करणार नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व पुढे नेत आहेत असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp