अशोक मामांसोबत काम करण्याचं स्वप्न होतं; रितेश देशमुखने अशोक सराफांना दिल्या खास शुभेच्छा

मुंबई तक

• 05:20 AM • 04 Jun 2022

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा आज वाढदिवस असून, अभिनेता रितेश देशमुखने त्यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. रितेश देशमुख दिग्दर्शित वेड चित्रपटात अशोक सराफ यांनी भूमिका साकारलीये. अशोक सराफ यांनीही रितेश देशमुखचं कौतूक केलंय. अशोक सराफ यांच्याबद्दल बोलतान रितेश देशमुख म्हणाला, “गेले २० वर्षांपासून मी सिनेसृष्टीत काम करतोय आणि अशोक मामांसोबत काम करण्याची संधी मला कधीच […]

Mumbaitak
follow google news

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा आज वाढदिवस असून, अभिनेता रितेश देशमुखने त्यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. रितेश देशमुख दिग्दर्शित वेड चित्रपटात अशोक सराफ यांनी भूमिका साकारलीये. अशोक सराफ यांनीही रितेश देशमुखचं कौतूक केलंय.

हे वाचलं का?

अशोक सराफ यांच्याबद्दल बोलतान रितेश देशमुख म्हणाला, “गेले २० वर्षांपासून मी सिनेसृष्टीत काम करतोय आणि अशोक मामांसोबत काम करण्याची संधी मला कधीच मिळाली नव्हती. जेव्हा वेड चित्रपटाच्या लेखनाचं काम सुरु होतं, तेव्हा कुठे तरी वाटत होतं या चित्रपटात अशोक मामांची भूमिका असावी. जेणेकरून अशोक मामांसोबत काम करण्याचं माझं स्वप्न पूर्ण होईल.”

“मी पहिला चित्रपट दिग्दर्शित करतोय आणि त्यात अशोक मामा आहेत हे सर्व स्वप्नवत आहे. अशोक मामांना सोबत काम करण्याचा अनुभव विलक्षण होता. मुळात त्यांचा अनुभव दांडगा आहे. त्यामुळे एखादा विनोदी सीन करताना त्यांनी आपल्या अनुभवातून त्यात आवश्यक ते बदल करून त्याला जिवंतपणा आणला,” असा अनुभव रितेशने सांगितला.

“एका दिग्दर्शकाला आपला लाडका अभिनेता आपण लिहून दिलेल्या सीनपेक्षा खूप काही आपल्या अभिनय कौशल्यातून देतो तेव्हा आणखी काय हवंय? आज अशोक मामांचा ७५ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मी त्यांना खूप खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना करतो,” अशा शब्दात रितेशने अशोक सराफ यांना शुभेच्छा दिल्या.

रितेशबद्दल अशोक सराफ काय म्हणाले?

वयाच्या पंचाहत्तरीत अफाट उत्साह असलेल्या अशोक सराफ यांना वेड चित्रपटाबद्दल विचारलं असता, त्यांनी भावना व्यक्त केल्या. अशोक सराफ म्हणाले, “जेव्हा मला कळलं की वेड चित्रपटाचं दिग्दर्शन रितेश देशमुख करत आहेत, तेव्हा कोणताही मागचा पुढचा विचार न करता मी होकार दिला. कारण माझ्या दृष्टीने हे महत्वाचे होते की तो दिग्दर्शक बनतोय.”

“रितेश एक गुणी कलाकार आहे. तो दिग्दर्शन करत असताना मला देखील काही नवीन शिकता येईल, हा माझा हेतू होता. खरं सांगतो या चित्रपटाचे शूटिंग मी खूप एन्जॉय केलं. धम्माल मजा केली. रितेश हा अतिशय थंड डोक्याने सेट वर काम करत होता. कुठे ही त्याने एक्साइटमेंट दाखवली नाही.”

“रितेशने प्रत्येक सीनवर विचारपूर्वक काम केलं आहे. थंड डोक्यानं काम करणारे दिग्दर्शक फार कमी आहेत. मला वाटतं रितेशच्या रूपाने आपल्याला नवीन दिग्दर्शक मिळाला आहे. वेड हा चित्रपट अतिशय उत्तम बनला आहे, यात काहीच शंका नाही,” असं अशोक सराफ म्हणाले.

“आणखी एक बाब म्हणजे या चित्रपटाद्वारे रितेशची पत्नी जेनेलिया मराठीतून पदार्पण करत आहे. तिने पण मराठी समजून घेऊन उत्तम काम केले आहे. या सर्व अनुभवातून एकच सांगावेसे वाटते की माझ्या आयुष्यात एक चांगला चित्रपट केल्याचा फील मला आला. या चित्रपटाच्या निमित्ताने रितेश म्हणून मला एक चांगला मित्र भेटला असं मी म्हणेल,” असं अशोक सराफ म्हणाले.

    follow whatsapp