रांजणगावातील महागणपतीच्या मंदिरात डोळ्याचं पारणं फेडणारी सजावट!

मुंबई तक

• 11:47 AM • 19 Sep 2021

आज (19 सप्टेंबर) अनंत चतुर्दशीनिमित्त आपल्या लाडक्या बाप्पाला आज निरोप दिला जात आहे. अनंत चतुर्दशीनिमित्तच रांजणगाव येथील महागणपतीला आकर्षक विविधरंगी फुलांनी मंदिर गाभारा सजवण्यात आला आहे. यावेळी लाडक्या बाप्पाला 1111 चिकूंचा महानैवेद्य तसेच 1111 मोदकांचा ही महानैवेद्य दाखवण्यात आला आहे. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यभरातील […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

आज (19 सप्टेंबर) अनंत चतुर्दशीनिमित्त आपल्या लाडक्या बाप्पाला आज निरोप दिला जात आहे.

अनंत चतुर्दशीनिमित्तच रांजणगाव येथील महागणपतीला आकर्षक विविधरंगी फुलांनी मंदिर गाभारा सजवण्यात आला आहे.

यावेळी लाडक्या बाप्पाला 1111 चिकूंचा महानैवेद्य तसेच 1111 मोदकांचा ही महानैवेद्य दाखवण्यात आला आहे.

कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येत आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यभरातील मंदिरं बंद आहेत. त्यामुळे भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश बंदी आहे. मात्र असं असलं तरीही मंदिर गाभाऱ्यातील विधी हे नित्यनियमाने सुरू आहेत.

    follow whatsapp