उस्मानाबाद: खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) आणि आमदार राणा जगजितसिंग पाटील (Ranajagjitsinha Patil) यांच्यातल्या कलेक्टरसमोर झालेल्या तू-तू मैं-मैं मुळे उस्मानबादचे (Osmanabad) राजकारण पुन्हा एकदा तापायला सुरुवात झाली आहे. निंबाळकर आणि पाटील ही दोन्ही जिल्हातली मातब्बर घराणी. एकाच घराण्यातली ही दोन कुटुंब पण जिल्हाच्या राजकारणात त्यांच्यातून विस्तवही जात नाही. त्यांच्यातल्या वैर हे फक्त राजकारणातलं नाही तर या वैराला रक्तरंजित किनार आहे आणि याच राजकीय वैमनस्याचे पडसाद कलेक्टरसमोर दिसले. निंबाळकर आणि पाटील घराण्यातलं नेमकं वैर काय? काय आहे राजकीय वैमनस्याचा इतिहास जाणून घेऊया सविस्तरपणे. (assassination of pawanraj a bloody history of the nimbalkar patil political enmity osmanabad)
ADVERTISEMENT
उस्मानाबादमधल्या निंबाळकर आणि पाटील घराण्याचे राजकीय वाद हे पुन्हा एकदा उफाळून आल्याचे दिसत आहे. दोन्ही घराणी जिल्हातली तालेवार घराणी. पण 2004 च्या निवडणुकांपासून त्यांच्यातल्या कुरघोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आणि त्याची परिणिती हा पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येत झाली.
पवनराजे निंबाळकर हे आत्ताचे खासदार असलेले ओमराजे निंबाळकर यांचे वडिल. तर डॉ. पद्मसिंहपाटील हे राणा जगजितसिंग यांचे वडील.
तारीख होती 3 जून 2006
पवनराजे निंबाळकर हे काँग्रेसचे नेते होते. काही कामासाठी हे मुंबईत आले होते. मुंबईतल्या कळंबोली भागातून त्यांना जमिनीच्या व्यवहारासाठी एक कॉल येतो. पवनराजे निंबाळकर हे शिळफाटा, कळंबोली भागात पोचतात. इथे त्यांच्यावर आधीपासून पाळत ठेवलेले शूटर्स असतात. ते शूटर्स पवनराजेंच्या गाडीला गाडी आडवी घालतात. त्यांच्यावर अंदाधुंद फायरिंग करतात. त्यातच पवनराजे जागीच ठार होतात. त्यांचा ड्रायव्हर हा जबर जखमी होतो. मारेकरी पळून जातात. पनवेलजवळ मारेकरी गाडी आणि हत्यारं सोडून पोबारा करतात.
2006 ला पवनराजेंची हत्या होते. महाराष्ट्र पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करावा याला निंबाळकर कुटुंबीय विरोध करतात. दोन वर्षांनी 2008 ला हा तपास सीबीआयकडे जातो. 2009 ला मुंबई क्राईम ब्रँचला एक मोठा क्लू मिळतो. त्याचां खबऱ्या एक माहिती समोर आणतो. खबऱ्य़ाच्या माहितीनुसार डोंबिवलीतून पारसमैल जैन या व्यक्तीला ताब्यात घेतलं जातं. ही अटक होते 2009 ला. पोलिसांच्या चौकशीत हे निष्पन्न होते की, पारसमल जैन हा तोच व्यक्ती असतो ज्याने पवनराजे निंबाळकरांना नवी मुंबईत कॉल करुन बोलवून घेतलेलं असतं.
‘तेव्हा हे दोघे उद्धव ठाकरेंची चाकरी करत होते’; ओमराजे निंबाळकर, कैलास पाटलांवर भाजपचा पलटवार
हा तपास सीबीआयकडे असल्यामुळे मुंबई पोलीस आरोपीला सीबीआयकडे सुपूर्द करतात. सीबीआयच्या माहितीनुसार पद्मसिंह पाटील, तेरणा साखर कारखान्याच्या डिस्टिलरी विभागातील सतीष मंदादे आणि डोंबिवलीचे तत्कालीन नगरसेवक मोहन शुक्ला यांनी पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचे प्लँनिंग केलं होतं.
पवनराजे निंबाळकर आणि पद्मसिंह पाटील यांच्यातल्या कुरघोडीच्या राजकारणामुळे हा कट करण्यात आला होता.
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी सीबीआयने जून 2009 मध्ये पद्मसिंह पाटील यांना अटक केली होती. पाटील त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उस्मानाबाद मतदार संघाचे खासदार होते. पण या दोघांमध्ये नेमकं राजकारण काय होतं ज्यामुळे थेट पवनराजेंची हत्या झाली तर यासाठी उस्मानाबादच्या राजकारणात काही वर्ष मागं जावं लागेल.
डॉ. पद्मसिंह पाटील हे उस्मानबादच्या राजकारणातलं मोठं नाव. 6 वेळा आमदार आणि एकदा खासदार असलेले पाटील हे राज्यात 2 वेळा मंत्रीही होते. जिल्हाचं राजकारण हे डॉक्टरांच्या इशाऱ्यावर चालत होतं. डॉक्टरांवर असलेल्या राजकीय जबाबदाऱऱ्यांमुळे पद्मसिंह पाटील हे खूपदा मुंबईत असायचे. तेव्हा जिल्हाच्या राजकारणात पद्मसिंह पाटलांची जागा हळूहळू पवनराजे निंबाळकरांनी घ्यायला सुरुवात केली.
पवनराजे निंबाळकर आणि पद्मसिंह पाटील हे दोघंही चुलत भाऊ, पद्मसिंहाचे वडील हे पाटलांच्या घरात दत्तक गेल्या आडनावं बदलेली होती.
तेव्हा जिल्हाच्या राजकारण पद्मसिंहांच्यावतीने पवनराजे बघू लागले होते. जिल्हाच्या संस्थाच्या राजकारणात डॉक्टरांचे कारखाने, संस्था यांच्यातले अनेक घोटाळे याच काळात बाहेर येऊ लागले. तेरणा कारखान्याचा साखर निर्यात घोटाळा, कारगिल निधी घोटाळा, तेरणा बॅकेचा होम ट्रे़ड घोटाळा हे सगळी मालिका तेव्हा महाराष्ट्रात गाजली होती. यातल्या साखर निर्यात घोटाळा, होम ट्रे़ड घोटाळा या प्रकरणांमध्ये पवनराजे निंबाळकर हेच मुख्य आरोपी होते.
यामुळे पद्मसिंह पाटलांच्या सांगण्यावरुन पवनराजे निंबाळकर हे सगळे घोटाळे करतात अशी प्रतिमा तेव्हाच्या जनमानसात होऊ लागलेली. तेव्हाच 2003 मध्ये अण्णा हजारे हे देखील याविरोधात मैदानात उतरले. त्यांनी पद्मसिंह पाटील यांच्याविरोधात उपोषणाची हाक दिली. पवनराजे यांनी अण्णा हजारेंना या प्रकरणातली माहिती दिल्याचा आरोप तेव्हा झाला आणि हेच मुख्य कारण ठरले ते पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर यांच्या फूट पडण्यासाठी.
ओमराजे निंबाळकरांनी औकात काढली; राणा जगजितसिंह पाटलांनी लायकी सांगत दिलं प्रत्युत्तर
उस्मानाबाद जिल्हाच्या राजकारणात उभी फूट पडली आणि तेव्हाच 2004 च्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या. पवनराजे आणि पद्मसिंह एकमेंकाविरोधात निवडणुकीच्या मैदानात उभे ठाकले.
या निवडणुकीच्या मतदानाचा दिवस उजाडला. उस्मानाबादमध्ये सकाळीच लोकांच्या पेपरमध्ये हेडलाईन असते पवनराजे निंबाळकरांचा डॉ. पद्मसिंह पाटलांना पाठिंबा? मतदारांना गोंधळात टाकणारी ही बातमी आली. बातमीसमोर प्रश्नचिन्ह असतं पण त्याकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नसतो.
पवनराजेंचे कार्यकर्ते दिसेल ‘पाठिंबा दिला नाही’ असा लोकांना सांगू लागतात पण व्हायचा परिणाम तो होतोच. पवनराजे निंबाळकर अवघ्या 484 मतांनी पराभूत होतात. पद्मसिंह पाटील जिंकतात पण त्यांच्यासाठी हा धोक्याचा इशारा असतो. इथून गोष्टी विस्कटत जातात.
2006 मध्ये पवनराजेंचा खून होतो. राजकीय वैमनस्यामुळे संशयाची सुई पद्मसिंहांकडे वळते. सीबीआय त्यांना अटक करते. काही दिवसांनी त्यांना जामीन मंजूर होतो. पद्मसिंह पाटील हे बाहेर येतात. पण 2014च्या निवडणुकीत मोदी लाटेत डॉक्टरांचे वर्चस्व संपते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकरांनी विजय मिळवतात आणि एक वर्तुळ पूर्ण होते.
ADVERTISEMENT