पनवेलजवळच्या तळोजा या ठिकाणी असलेल्या वृद्धाश्रमात 56 वृद्धांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यापैकी दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर या वृद्धाश्रमातल्या 14 जणांची प्रकृती गंभीर आहे.
ADVERTISEMENT
एकीकडे राज्यात कोरोनाचा कहर वाढतो आहे. तर दुसरीकडे तळोजा येथील वृद्धाश्रमातील 56 ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तळोजा मधील आबानंद वृद्धाश्रम येथे या कोरोना बाधितांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. एकूण 61 निराधार वृद्धांपैकी 56 वृद्ध कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. हे क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आले असून पनवेल मनपा प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.
14 गंभीर वृद्धांवर कामोठे मधील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. एकाच वेळी एकाच ठिकाणी कोरोनाबधित अधिक संख्येने आढळून आल्याने आता प्रशासनाने सावध पवित्रा घेतला आहे.
ADVERTISEMENT