पाच वर्ष आंदोलन करून देखील पुनर्वसन कार्यालय अधिकारी धरणग्रस्तांच्या कोणत्याही प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत. वर्षानुवर्ष पुनर्वसनाचे काम जैसे थे पडून आहे. आम्ही दाद कुणाकडे मागायची? आमचं पुनर्वसन कधी होणार? आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होतं आहे. हे सांगत काळम्मावाडी धरणग्रस्तांमधल्या 44 जणांनी जिल्हाधिकारी कार्यालयसमोर सामुदायिक आत्महदहनाचा प्रयत्न केला.
ADVERTISEMENT
धरणग्रस्त संघटनेच्यावतीने यापूर्वी अनेक वर्षे आंदोलन करण्यात आलं आहे. ऑगस्ट महिन्यात नऊ दिवस उपोषण केल्यानंतर पुनर्वसन अधिकाऱ्यांची बैठक झाली. पुढील एक किंवा दोन महिन्यात हा प्रश्न मार्गी लावू असं सांगितलं होतं, पण तब्बल 21 वर्षे झाली आहेत तरीही आमचा प्रश्न सुटलेला नाही. आमच्या प्रश्नांबाबत कोणताही विचार झाला नाही. धरणग्रस्त हेलपाटे मारून ती तीच सरकारी बाबूंचे उत्तरे ऐकून मेटाकुटीला आल्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात 44 जण धरणग्रस्त महिला व पुरुष अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर पोलीस अग्निशमन दल जवान डॉक्टर यांची टीम सकाळपासून तैनात करण्यात आली होती आंदोलन कर्त्यांनी हातामध्ये रॉकेल आणि डिझेलच्या बाटल्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय समोर आले आसता पोलिसांना त्यांची समजूत काढून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची बैठक घडवून आणली.
जिल्हाधिकाऱ्यांनी धरणग्रस्त शिष्टमंडळाला आश्वासन दिल्याने हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करत आहोत असं धरणग्रस्तांनी जाहीर केलं.. आणि पोलिस प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला.
ADVERTISEMENT