कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी सरकारी यंत्रणा वारंवार लस घेण्याचं आवाहन करत आहे. महाराष्ट्रात सध्या लसीचा तुटवडा असला तरीही सरकार उपलब्ध साठ्यात जास्तीत जास्त लस लोकांना देण्याचा प्रयत्न करतेय. परंतू अजुनही काही नागरिक लस घेताना टाळाटाळ करत आहेत. यासाठी औरंगाबाद शहरात लस न घेता रस्त्यावर फिरणाऱ्या व्यक्तींना दंड आकारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय.
ADVERTISEMENT
आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी याविषयी माहिती दिली. औरंबादमध्ये सध्याच्या घडीला ४५ वर्षांच्या पुढील गटात ३ लाखांपेक्षा अधिक लोकांनी लस घेतलेली नाहीये. शहरात ४५ वर्षाच्या पुढील वयोगटातील नागरिकांची संख्या ही साडेचार ते पाच लाखांच्या घरात आहे. परंतू यापैकी फार कमी लोकांनी लस घेतलेली आहे. त्यामुळे लस न घेता रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना दंड लावण्याचा निर्णय महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी घेतला आहे.
Sputnik-V: सीरम आता भारतात बनवणार रशियन बनावटीची स्पुटनिक-V लस, DCGI ची मंजुरी
शहरात लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून बाजारपेठ आणि पालिकेच्या मुख्य हद्दीत नागरिक मित्र पथकाकडून हा दंड आकारला जाणार आहे. याआधीही औरंगाबाद महापालिकेने लस न घेता रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना ५०० रुपयांचा दंड जाहीर केला होता. ४५ वर्षांवरील व्यक्तींना लस मिळावी यासाठी औरंगाबाद महापालिका ड्राईव्ह इन मोहीम राबवणार आहे.
ADVERTISEMENT