Shinde group mla letter to pm Narendra Modi : औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव करून दाखवल्यानंतर आता शिंदे गटाचे नेते औरंगाबादची कबर हटवण्यासाठी आक्रमक झाले आहेत. संभाजी राजांचे हाल करून मारणाऱ्या औरंगजेबाची आठवण नको. अहमदनगरमध्ये त्याचा मृत्यू झाला असताना समाधी इथे कशाला? असा सवाल उपस्थित करत औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी शिंदे गटाचे शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल आणि संजय शिरसाट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून करणार आहेत. (aurangzeb’s grave will be removed Shinde group will send a letter to the pm narendra modi)
ADVERTISEMENT
शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल आणि आमदार संजय शिरसाट यांनी औरंजेबाची कबर हटविण्यासाठी आक्रमक पावित्रा घेतलाय. त्यांच्या या मागणीनंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील देखील आक्रमक झाले आहेत. इम्तियाज जलील यांनी उपोषण सूरू केले आहेत. त्याचबरोबर आरोप प्र्त्यारोपांच राजकारण सुरु झाले आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात वातावरण चांगलेच तापले आहे.
MP Sanjay Jadhav : आधी ठाकरेंना घरचा आहेर अन् आता 48 तासांत घुमजाव…
विरोध करणाऱ्यांना जागा दाखवू…
गेल्या 35 वर्षांच्या मागणीनंतर औरंगाबादचे नामांतर झाले आहे. शिंदे फडणवीस सरकारने प्रस्ताव दिल्यावर केंद्र सरकारने छत्रपती संभाजीनगर असे नाव दिले असल्याची माहिती आमदार प्रदीप जैस्वाल यांनी दिली आहे. आज त्यावरून जातीतील वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. जिल्ह्याचे खासदार आपल्या कार्यकर्त्यांसह उपोषणाला बसले आहेत, शहरात काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने वातावरण खराब करत असल्याचा आरोप जैस्वाल यांनी जलील यांच्यावर केला आहे. आम्हाला कोणत्या जाती धर्माचा द्वेष नाही, मात्र जर कोणी नावाला विरोध करून राजकारण करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा जातीय तेढ निर्माण करत असेल, तर त्यांना त्यांची जागा दाखवू असा इशारा देखील प्रदीप जैस्वाल यांनी दिला.
Ramdas Kadam: “नारायण राणे गेले तेव्हा तुमची #@ पिवळी झाली”, ठाकरेंवर वार
बिर्यांणी खाऊन उपोषण करायचं…
शहराचे नाव औरंगाबाद ठेवण्याच्या मागणीसाठी एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आंदोलनाला सुरुवात केली होती. मात्र रविवारी रात्री उपोषण ठिकाणी कार्यकर्त्यांनी बिर्याणी पार्टी केली. आमच्या नजरेत उपोषण म्हणजे काही न खाता, न पिता बसणे असा होतो. मात्र बिर्याणी खाऊन जर उपोषण केला असेल तर याचा अर्थ सर्वांनी समजून घ्यावा, असे संजय शिरसाट म्हणाले आहेत. उपोषण करुन माथी भडकवायची, दावत देऊन उपोषण करण्यात काय अर्थ ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. तसेच उपोषण ठिकाणी काही गुंड प्रवृत्तीचे लोक येऊन वातावरण खराब करत आहेत. याबद्दल मी आता पोलीस आयुक्तांना भेटलो असल्याचे शिरसाट यांनी सांगितलं.
नामांतर पूर्ण! औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्ह्यांबाबत आदेश निघाला
पंतप्रधानांना लिहणार पत्र…….
औरंगजेबाचा मृत्यू अहमदनगरला झाला त्यानंतर दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह इकडे आणला, आमचा आणि त्याचा काही संबंध नाही, त्याची कबर इथे नको, ओवेसींना आपुलकी असेल तर ती हैदराबादला हलवावी. तसे केल्यास ओवसी आणि इम्तियाज जलील यांना समाधी दर्शन घेण्यासाठी खुलताबाद येथे जाण्याची गरज नाही. यासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहणार असल्याचं प्रदीप जैस्वाल आणि संजय शिरसाट यांनी सांगितलं आहे.
दरम्यान नामांतरावरून आधीच छत्रपती संभाजीनगरमध्ये वातावरण तापले आहे, त्यात आता औंगजेबाची कबर हटवण्यावरून वातावरण आणखीण तापण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT