कल्याण: रेल्वेत प्रवास करताना दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशाच्या हातावर काठी मारून मोबाइल लुटणाऱ्या दरोडेखोराला कल्याण रेल्वे पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. पण अटकेपासून वाचण्यासाठी दरोडेखोराने चक्क पोलिसालाच दाताने चावा घेतला. ज्यामध्ये पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. अटक केलेल्या दरोडेखोरावर शहरातील विविध पोलिस ठाण्यात यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. सध्या न्यायालयाने त्याला 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ADVERTISEMENT
मनीषा ज्ञानचंद होतचंदानी डोंबिवली ते अंबरनाथ लोकल ट्रेनने आपल्या घरी परतत असताना कल्याण विठ्ठलवाडी स्थानकाच्या मधोमध एका खांबाच्या आच्छादनाखाली एक चोर उभा होता. पण खाली उतरल्यानंतर विठ्ठलवाडीत तैनात असलेल्या जीआरपीला माहिती देऊन कल्याणला गेले. त्याच्यासोबत स्टेशन आणि नंतर पायीच घटनास्थळी गेले.
घटनास्थळी मनीषाने पाहिले की, ज्या चोराने तिचा मोबाईल पाडला होता त्यालाच साध्या गणवेशातील पोलिसांनी पकडला होता. विकास केदारे हे साध्या वेशात ड्युटीवर असताना पत्री पुल होमीबाबा टेकडी येथील रहिवासी असलेल्या अजय अर्जुन कांबळे या चोरट्याने पळून जाण्याच्या प्रयत्नात होता.
याचवेळी विकास केदारे यांनी त्याचा शर्ट पकडला. मात्र तरीही तो पळून जाणाचा प्रयत्न करत होता. त्यानंतर आरोपी अजय कांबळेने विकास केदारे यांच्या हाताला चावा घेतला. यावेळी विकासने धाडस दाखवत मजबूत पकड राखत चोरट्या अजय कांबळे याला पकडून ठेवलं.
अटक करण्यात आलेल्या आरोपी अजयवर चोरीचे इतरही अनेक गुन्हे दाखल आहेत. यामुळेच अजय कांबळे याला कोर्टाने 24 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
कोल्हापूर: आयुर्वेद पंचकर्म मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट, महिलेला अटक
तब्बल 31 मोबाइलसह चोरट्याला पोलिसांनी केली अटक
रस्त्याने चालणारे नागरिकांचे जबरीने मोबाईल लंपास करून पसार होणाऱ्या सराईत चोरट्याला मानपाडा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे अटक केली. तसेच त्याच्याकडून 31 मोबाईल देखील हस्तगत केले आहेत. अशी माहिती डोंबिवलीचे विभागाचे सहायक पोलीस आयुक्त जे.डी. मोरे यांनी दिली आहे.
डोंबिवली, कोळसेवाडी, मानपाडा आदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोबाइल चोरी झाल्याचे तक्रारी दाखल होत होत्या. फिर्यादी रामकुमार मुन्सी सिंह 22 ऑगस्ट रोजी सकाळी पिंपळेश्वर मंदिराच्या पाठीमागील गेट समोरील रोडवर पायी चालत असताना पाठीमागून आलेल्या एका अनोळखी दुचाकीस्वाराने त्यांच्याकडील मोबाईल जबरीने खेचून पळून गेला.
याबाबत राजकुमार यांनी मानपाडा पोलिस स्थानकात तक्रार केली. त्याअनुषंगाने वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अविनाश वणवे, पोलीस हवालदार राजेंद्र खिल्लारे, विजय कोळी, पोलीस निरीक्षक सुरेश मदने, प्रवीण किनरे, दीपक गडगे आदी पथकाने सीसीटीव्हीच्या सहाय्याने आरोपी सुफियान बागवान याला भिवंडीच्या नई बस्तीमधून पेट्रोलिंगच्या दरम्यान अटक केली आहे.
ADVERTISEMENT