महाराष्ट्रातला नगर जिल्हा आणि नगर जिल्हातली पुणे – नगर महामार्गावरची ही घटना, एक कार चाललेली असते, कारला दोन दुचाकी स्वार ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतात कारचालक आणि दुचाकी स्वारांमध्ये बाचाबाची होते. दुचाकी स्वार गाडी आडवी घालून कार थांबवतात आणि कारमध्य़े बसलेल्या महिलेचा गळा चिरुन हत्या करतात.
ADVERTISEMENT
पोलीस घटनास्थळी येतात. हत्या झालेली महिला साधीसुधी नसते तर नगर जिल्हातल्या यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा असते. पोलीसांच्या तपासाची चक्र फिरु लागतात. 48 तासांच्या पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातात.
सुरुवातीला बाचाबाचीतून झालेली ही हत्य़ा वेगळेच वळण घेते आणि आरोपींनी रिमांडमध्ये घेतल्या आरोपींच्या तोंडून ज्यांचे नाव बाहेर पडते ते ऐकून सगळा नगर जिल्हा हादरतो कारण ही असामी साधीसुधी नसते, ही असामी असते नगरचे सुविख्यात पत्रकार बाळ बोठे आणि ज्या महिलेची हत्या करण्यात आली त्या महिलेचे नाव होते रेखा जरे, यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा..
30 नोव्हेंबरला रेखा जरे यांचा मर्डर झाला आणि नंतर तब्बल 103 दिवसांनंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठेला अटक करण्यात आली.
103 दिवसांचा घटनाक्रम काय होता ते आपण जाणून घेऊ या
30 नोव्हेंबर – नगर पुणे महामार्ग जातेगाव घटना
3 डिसेंबर – रेखा जरे हत्या प्रकरणात आरोपी पत्रकार बाळ ज बोठे याचे नाव उघड झाल्यानंतर बोठे पसार
7 डिसेंबर – अटकपूर्व जामिनासाठी बाळ बोठेचा जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज
8 डिसेंबर – न्यायालयात बोठेच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी, सरकारी पक्षाला नोटीस काढत म्हणणे मांडण्यास सांगितले
11 डिसेंबर – आरोपी बाळ बोठे याने अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी सुरू असताना, न्यायालयात हजर राहण्याबाबत सरकारी पक्षाने दिला अर्ज
14 डिसेंबर: सरकारी पक्षाकडून देण्यात आलेल्या अर्जावर दोन्ही बाजूचे युक्तीवाद झाले. त्यानंतर सरकारी पक्षाचा अर्ज न्यायालयाने नामंजूर केला
15 डिसेंबर: बाळ बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण. दोन्ही बाजुचे युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निकाल ठेवला राखीव
17 डिसेंबर: बोठे याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पारनेर न्यायालयात स्टॅंडिंग वॉरंट साठी अर्ज दाखल
6 जानेवारी न्यायालयाने स्टॅंडिंग वॉरंट जारी केले
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात बाळ बोठेने केले औरंगाबाद हायकोर्टात अपील
1 फेब्रुवारी औरंगाबाद हायकोर्ट यांचा जामीन अर्ज फेटाळला
26 फेब्रुवारी पाच आरोपींविरुद्ध पारनेर न्यायालयात पोलिसांनी केले चार्ज शीट दाखल
1 मार्च – फरार घोषित करण्यासाठी सीआरपीसी 82 प्रमाणे पोलिसांचा पारनेर न्यायालयात अर्ज
4 मार्च – रोजी न्यायालयाने त्याला फरार घोषित केले
5 मार्च – पोलिसांनी बाळ बोठे याच्या घरी जाऊन ते फरार असल्याचे नोटीस चिटकवली
13 मार्च – बाळ बोठेंना हैदराबादमधून अटक
बाळ बोठे नेमके कोण
तब्बल 3 दशकांची पत्रकारिता
मराठी वर्तमानपत्राचे संपादक
8 पुस्तकं प्रकाशित, 3 पुस्तकं प्रकाशनाच्या वाटेवर
नगर जिल्ह्याच्या राजकारणावर पीएचडी
16 विषयांत पदव्युत्तर शिक्षण
बाळ बोठे आणि हनी ट्रॅप प्रकरण
गेल्या काही महिन्यांपूर्वी बोठे यांनी हनी ट्रॅपची मालिका वृत्तपत्रात सुरु केली होती. त्यातून अनेक मोठमोठ्या राजकीय, सामाजिक, व्यापारी व्यक्तींची नावे समोर आली होती. हनी ट्रप कसा लावला जातो, मोठमोठ्य़ा व्यक्तींना, अधिकाऱ्यांना यात कसे अडकवले जाते य़ाची डिटेल माहिती यात दिली जायची. या सदराचा आणि रेखा जरे प्रकरणाचा काही संबंध आहे का असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. तर नगर शहरात याच्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
तर हे होते रेखा जरे हत्या प्रकरण…. आता पोलीस तपास करत आहेत आणि रेखा जरे यांची हत्या नेमकी का करण्य़ात याची उकल ते करतीलच पण 103 दिवसांना पोलीसांना गुंगारा देणाऱ्या बाळ बोठेला जेरबंद नगर पोलीस अखेर यशस्वी ठऱले आहेत
ADVERTISEMENT