पालखी महामार्गात जाणार होतं छत, बारामतीच्या पठ्ठ्याने अख्खं घरचं उचललं

मुंबई तक

• 06:02 AM • 21 Mar 2023

Baramati house shifting news : बारामती : तालुक्यातून जात असलेल्या संत तुकाराम महाराज राष्ट्रीय पालखी महामार्गाच्या (Sant Tukaram Maharaj Nation Highway) कामाला वेग आला आहे. आता भूसंपादन झालेल्या आणि रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या इमारती पाडण्याचे काम सुरू आहे. मात्र, काटेवाडीतील (Baramati) एकाने वडिलांच्या आठवणी जपण्यासाठी दोन मजली इमारत न पडता जॅकच्या साह्याने इमारत शिफ्ट करण्याचा निर्णय […]

Mumbaitak
follow google news

Baramati house shifting news :

हे वाचलं का?

बारामती : तालुक्यातून जात असलेल्या संत तुकाराम महाराज राष्ट्रीय पालखी महामार्गाच्या (Sant Tukaram Maharaj Nation Highway) कामाला वेग आला आहे. आता भूसंपादन झालेल्या आणि रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या इमारती पाडण्याचे काम सुरू आहे. मात्र, काटेवाडीतील (Baramati) एकाने वडिलांच्या आठवणी जपण्यासाठी दोन मजली इमारत न पडता जॅकच्या साह्याने इमारत शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. या भागात पहिल्यांदाच असा प्रयोग होत असल्याने लोकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. (Baramati – A man shifiting his house for Sant Tukaram Maharaj Nation Highway )

काटेवाडी येथील अकबर दादासाहेब मुलाणी यांची 3 हजार फूट दुमजली इमारत 10 ते 15 फूट मागे सरकवली जाणार आहे. यासंबंधीचे काम मागील महिन्यापासून सुरू आहे, आता हे काम पूर्णत्वास आले असून येत्या 2 दिवसांत ही इमारत 5 फूट उंच उचलून 9 फूट मागे घेतली जाणार आहे.

हरियाणातून आणला खास ठेकेदार :

दरम्यान, बारामतीमधील या प्रयोगासाठी थेट हरियाणातून खास प्रशिक्षित ठेकेदाराला आणण्यात आले आहे. मोहनलाल नावाच्या या ठेकेदाराने आतापर्यंत उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली आदी राज्यांमधील १ हजारहून अधिक इमारती स्थलांतरीत केल्या आहेत. तसंच आडव्या इमारती त्या सरळ करून दिल्या आहेत.

Chitra Wagh: “असं वक्तव्य एखादी ‘सटवी’च करू शकेल”, वाघांचा चढला पारा

मुलाणी यांनी याबाबत सांगितलं की, इमारत रस्त्याच्या अगदी कडेला येत होती. पाठीमागे जागा शिल्लक होती. ही इमारत पाडायला देखील मोठा खर्च येत होता. नव्याने इमारत उभी करायची झाल्यास 50 लाख रुपये खर्च आला असता. मग यू ट्यूबवर सर्च केले आणि हरियाणातील या लोकांचा शोध लागला. या लोकांशी संपर्क साधला. त्यांनी १५ लाख रुपये खर्च सांगितला. त्यामुळे इमारत पाडण्यापेक्षा ती मागे घेऊन त्याचा पुनर्वापर करता येणे शक्य असल्याने हा पर्याय निवडण्यात आला. योगायोगाने पाठीमागे दहा फूट जागा शिल्लक असल्याने हे शक्य झाले असे मुलाणी यांनी सांगितले.

    follow whatsapp