आरोपीच्या हातावर असलेल्या टॅटू वरून एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून फरार झालेल्या आरोपीचा शोध बारामती पोलिसांनी लावला आहे. पीडित मुलगी चार महिन्यांची गरोदर असून उपचारासाठी दवाखान्यात गेल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. मात्र मुलगी या आरोपीला जास्त ओळखत नसल्याने केवळ सांगितलेल्या वर्णनावरून आणि हातावरील टॅटू वरून बारामती शहर पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले आहे.
ADVERTISEMENT
सलीम उर्फ सागर इक्बाल मुश्रीफ असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सांगितले की, पीडित मुलगी शाळेत जात असताना तिची आणि संशयित आरोपीची ओळख झाली. या ओळखीतून त्याने बारामती येथील नीरा डावा कालव्या लगत तीन ते चार वेळा बलात्कार केला. मुलीची पाळी चुकल्याने आईने विश्वासात घेऊन तिच्याकडे चौकशी केली असता तिने हा धक्कादायक प्रकार आईला सांगितला. मात्र, समाजात बदनामी होईल म्हणून या प्रकाराची कुठेही वाच्यता न करता 25 नोव्हेंबर रोजी पुण्याच्या ससून रुग्णालयात पीडित मुलीला उपचार घेण्यासाठी गेली होती.
पुण्यातील ससुन रुग्णालयात ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी मुलीकडे कसून चौकशी केल्यानंतर पीडित मुलीने आरोपीचं वर्णन पोलिसांना सांगितलं. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी तातडीने उपनिरीक्षक गणेश पाटील आणि त्यांच्यासमवेत महिला कर्मचाऱ्यांना पाठवून घटनेची माहिती घेतली. यावेळी संबंधित मुलीने आपण आरोपीला नावासह ओळखत नाही. मात्र, त्याच्या हातावर बदामाच्या आकाराचे चित्र गोंदलेले आहे. या जुजबी माहितीवरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि सागर उर्फ सलीम मुश्रीफ याला अटक केली. त्याच्यावर बलात्कारा सह बालकांचे लैंगिक कापडापासून संरक्षण अधिनियम नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उस्मानाबाद : डान्सबारवर छापा, २५ महिलांसह ६४ पुरुष ताब्यात
ADVERTISEMENT