Mumbai Rain: रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी समुद्र किनारी जाण्यास बंदी

मुस्तफा शेख

• 05:02 PM • 07 Jul 2022

ज्या दिवशी रेड अलर्ट आणि ऑऱेंज अलर्ट असेल तेव्हा सकाळी ६ ते १० या वेळेतच समुद्र किनारी जाणाऱ्यास संमती देण्यात आली आहे. त्यानंतर कुणीही या ठिकाणी किंवा बीचेसवर फिरकू नये असं मुंबई महापालिकेने म्हटलं आहे. मुंबई महापालिकेने यासंदर्भातल्या सूचना जारी केल्या आहेत. यंदाच्या मान्सूनमध्ये समुद्रात बुडून १० लोकांचा जीव गेला आहे. त्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय […]

Mumbaitak
follow google news

ज्या दिवशी रेड अलर्ट आणि ऑऱेंज अलर्ट असेल तेव्हा सकाळी ६ ते १० या वेळेतच समुद्र किनारी जाणाऱ्यास संमती देण्यात आली आहे. त्यानंतर कुणीही या ठिकाणी किंवा बीचेसवर फिरकू नये असं मुंबई महापालिकेने म्हटलं आहे. मुंबई महापालिकेने यासंदर्भातल्या सूचना जारी केल्या आहेत. यंदाच्या मान्सूनमध्ये समुद्रात बुडून १० लोकांचा जीव गेला आहे. त्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय मुंबई महापालिका प्रशसनाने घेतला आहे.

हे वाचलं का?

Maharashtra Rain : मुंबईसह कोकणाला ऑरेंज अलर्ट, पाच दिवस ‘कोसळधार’

मुंबईत रेड अलर्ट तसंच ऑरेंज अलर्ट ज्या दिवशी देण्यात आला आहे त्यावेळी समुद्र किनाऱ्यांवर गर्दी करू नका, बीचवर पोहायला जाऊ नका असं आवाहन वारंवार आवाहन करण्यात आलं होतं. मात्र ते आवाहन लोक पाळत नाहीत असं दिसून आलं आहे. त्यानंतर रेड अलर्ट किंवा ऑरेंज अलर्ट असताना कुणीही समुद्र किनारी किंवा बीचेसवर फिरायला किंवा पोहायला जाऊ नये असं स्पष्ट करण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेने यासंदर्भातलं एक पत्रक काढलं आहे.

नेमकं काय म्हटलं आहे मुंबई महापालिकेने?

मुंबईतल्या समुद्र किनाऱ्यांवर ऑरेंज अलर्ट आणि रेड अलर्ट असताना सकाळी ६ ते १० या वेळेतच जाण्यास नागरिकांना संमती देण्यात आली आहे. हवामान खात्याने पुढचे पाच दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे पुढचे पाच दिवस मुंबईकरांनी सकाळी ६ ते १० ही वेळ सोडून समुद्र किनारी जाऊ नये. समुद्र किनाऱ्यांवर लाइफ गार्ड तसंच पोलीस तैनात असतील आणि लोकांकडून या नियमांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतील. असंही पत्रकात म्हटलं आहे.

Rain Alert : मुंबई-पुण्यासह ‘ही’ शहरं पावसाच्या रडारवर; पुढील तीन तासांत मुसळधार

मुंबईत पुढचे पाच दिवस ५ दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसंच ७ आणि ८ जुलै या दोन दिवशी अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतल्या काही भागात पाणी साठलं होतं. तसंच लोकल सेवा विस्कळीत झाली होती आणि वाहतूक कोंडीही झाली होती. अंधेरी, घाटकोपर, चेंबूर, दादर या ठिकाणी लोक साठलेल्या पाण्यातून वाट काढत मार्ग काढत घर गाठताना दिसले. संध्याकाळी पावसाचा जोर कमी झाला होता त्यामुळे पाणी ओसरलं. मात्र रात्रभर पुन्हा पाऊस झाला आहे.

कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलाय. कोकण, पश्चिम महाराष्ट्रासाठी हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. खबरदारीचा उपाय म्हणून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागात 15 एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

    follow whatsapp