ADVERTISEMENT
संपूर्ण जग नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालेलं असताना देशात पर्यटकांचं खास आकर्षण असलेले गोव्याचे किनारे सज्ज झाले आहेत.
यंदा नवीन वर्षाच्या स्वागतावर कोरोनाचं सावट असल्यामुळे सेलिब्रेशन हे नियमांच्या चौकटीत राहून करावं लागणार आहे. तरीही यावर्षी गोव्याचे समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले आहेत.
देशभरातले अनेक पर्यटक यानिमीत्ताने गोव्यात दाखल झाले आहेत.
समुद्रकिनारी असलेली हॉटेल आणि रेस्टॉरंट पर्यटकांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करत आहेत.
गोव्याच्या कलंगुट बीचला प्रेक्षकांची भरभरुन पसंती मिळते.
ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येमुळे यंदा गोव्यातही सेलिब्रेशनला थोडासा फटका बसला आहे.
परंतू पर्यटक आपल्या नेहमीच्या उत्साहात गोव्यात सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.
ADVERTISEMENT