Lucknow Building Collapse: बघता बघता इमारत पत्त्यांसारखी कोसळली! 8 जणांचा मृत्यू, पाहा VIDEO

मुंबई तक

08 Sep 2024 (अपडेटेड: 08 Sep 2024, 08:59 AM)

Lucknow Building Collapse : लखनौच्या ट्रान्सपोर्ट नगर परिसरात तीन मजली इमारत कोसळल्याची दुर्देवी घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय.

Lucknow Building Collapse Latest Update

Lucknow Building Collapse Latest Update

follow google news

बातम्या हायलाइट

point

चार वर्षांपूर्वीच बांधलेली इमारत कोसळली

point

या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू, तर 28 जखमी

point

इमारत कोसळण्याचं नेमकं कारण काय?

Lucknow Building Collapse : लखनौच्या ट्रान्सपोर्ट नगर परिसरात तीन मजली इमारत कोसळल्याची दुर्देवी घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. एनडीआरएफ (NDRF), एसडीआरएफ (SDRF) आणि जिल्हा प्रशासनाचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. चार वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली इमारत कोसळल्यामुळं 28 जण जखमी झाले आहेत. जखमींना लोक बंधू रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. शनिवारी रात्री मुसळधार पाऊस पडल्यानंतर ही दुर्देवी घटना घडली.

हे वाचलं का?

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या मलब्यातून आठ जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. रिलीफ कमिश्नर जीएस नवीन यांनी म्हटलंय की, एसडीआरएफने रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान आणखी तीन जणांचा मृतदेह बाहेर काढला आहे. राज किशोर (27), रुद्र यादव (24) आणि जागरुप सिंह (35) अशी मृतांची नावं आहेत. याआधी धीरज गुप्ता (48), पंकज तिवारी (40), अरुण सोनकर (28), राकेश लखनपाल (67) आणि जसप्रीत सिंह साहनी (41) यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.

मुसळधार पावसानंतर घडली घटना

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटलंय की, इमारतीच्या मलब्याखाली आणखी काही मृतदेह अडकले आहेत का? हे पाहावं लागणार आहे. या इमारतीचं बांधकाम जवळपास चार वर्षांपूर्वी केलं होतं, असं पोलिसांचं म्हणणं आहे. इमारत कोसळण्यापूर्वीही काही बांधाकाम सुरु होतं. शनिवारी रात्री मुसळधार पाऊस पडल्यानंतर ही घटना घडली. त्यावेळी काही कामगार ग्राऊंड फ्लोअरवर काम करत होते. 


ग्राऊंड फ्लोअरवर होता मोटर वर्कशॉप

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या ग्राऊंड फ्लोअरवर एक मोटर वर्कशॉप आणि गोडाऊन होतं. पहिल्या मजल्यावर मेडिकलचा गोडाऊन आणि दुसऱ्या मजल्यावर एक कटलरी गोडाऊन होता. मेडिकल गोडाऊनमध्ये काम करणाऱ्या आकाश सिंहने सांगितलं की, इमारतीच्या एका खांबाला तडे गेले होते. पाऊस पडत असल्यानं आम्ही ग्राऊंड फ्लोअरवर आलो होतो. त्यावेळी आम्ही पाहिलं की, इमारतीच्या एका खांबाला तडे गेले होते. त्यावेळी ही इमारत अचानक कोसळली. 

    follow whatsapp