गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये सुरू असलेल्या धक्कादायक घटनांची मालिका संपता संपेना. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्र ढवळून निघाला. त्यानंतर कळंबा गावचे सरपंच ज्ञानेश्वर इंगळे यांच्याही अपहरणाचा प्रयत्न झाला आणि आता पुन्हा एकदा एका सरपंचाचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. औष्णिक विद्युत प्रकल्पातील राखेची वाहतूक करणाऱ्या ट्रकने अंबाजोगाई तालुक्यातील सौंदाना गावच्या सरपंचाला चिरडल्याची घटना समोर आली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Laxman Hake on BJP : "आम्ही BJPला निवडून देण्याचं आवाहन केलं, पण आता गिल्टी फील होतंय"
शनिवारी 11 जानेवारीला मिरवड फाट्यावर ही घटना घडली. राखेची वाहतूक करणाऱ्या हायवाने दुचाकीवरुन जाणाऱ्या सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीवरुन जाणारे अभिमन्यू पवार हे हायवाच्या धडकेने दुरवर फेकले गेले. या घटनेमुळे सौंदाना गावावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर हायवा चालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे. या घटनेत अनेकांकडून संशय व्यक्त केला जात असला तरी, तशी खात्रीलायक माहिती अजून समोर आलेली नाही.
हे ही वाचा >> Laxman Hake on BJP : "आम्ही BJPला निवडून देण्याचं आवाहन केलं, पण आता गिल्टी फील होतंय"
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील पवनचक्की आणि औष्णिक विद्युत प्रकल्पातून निघणाऱ्या राखेचा आणि त्यातून निर्माण झालेल्या माफीयांचा मुद्दा चर्चेत आहे. अशातच त्याच राखेची वाहतूक करणाऱ्या या हायवाने सरपंचाला उडल्यानं शंका व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT
