विकास राजूरकर, चंद्रपूर: चंद्रपूरमध्ये एक अत्यंत धक्कादायक अशी घटना समोर आली आहे. चंद्रपूर शहराच्या बाहेरील एका शेतात एका तरुणीचं मुंडकं छाटलेला मृतदेह सापडल्याने एकच खळबळ माजली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तरुणीचा मृतदेह हा पूर्णपणे विविस्त्र अवस्थेत आढळून आला आहे. याशिवाय तरुणीचं मुंडकं अद्यापही सापडलेलं नाही. अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आलेल्या या खुनाच्या प्रकरणात आता पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. पण अद्याप तरुणीची ओळख पटू शकलेली नाही. या भयंकर हत्येचा छडा लावण्यासाठी आता पोलिसांच्या 9 टीम कामाला लागल्या आहेत.
ADVERTISEMENT
या हत्येचा छडा लावणं हे पोलिसांसमोरील सर्वात मोठं आव्हान आहे. कारण मारेकऱ्याने कोणताही पुरावा मागे सोडलेला नाही. यामुळे पोलिसांसमोर अनेक अडचणी येत आहे. तरुणीची ओळख पटू नये, हत्येमागचा नेमका हेतू काय या सगळ्याचा विचार करुन मारेकऱ्याने तरुणीची सुनियोजितपणे हत्या केली असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता मारेकऱ्याला शोधण्यासाठी पोलीस सर्व बाजूने तपास करत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
हे प्रकरण चंद्रपूरमधील भद्रावती शहरातील सुमठाना परिसरातील आहे. येथे जवळच शासकीय ITI कॉलेजच्या समोर असणाऱ्या शेतात एका तरुणीचा मुंडकं गायब असलेला मृतदेह काल दुपारी आढळून आला. याबाबतची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पाहून पोलिसांना देखील धक्का बसला. गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ मृतदेह ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.
शासकीय ITI कॉलेजच्या समोर अमोल झाडे यांचं शेत आहे. दुपारी ते आपल्या शेतात जात असताना बाजूच्या शेतात एका तरुणीचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह त्यांना दिसला. जेव्हा ते मृतदेहाच्या जवळ गेले तेव्हा त्यांना प्रचंड धक्का बसला. कारण तरुणीचं मुंडकं नसलेला मृतदेह तिथे पडला होता. त्यामुळे अमोल यांनी याप्रकरणाची माहिती तात्काळ पोलिसांना दिली.
भद्रावती पोलीस ठाण्याचे ठाणेदार गोपाल भारती यांनी याबाबत अशी माहिती दिली की, मृतदेह सापडलेली तरुणी ही 25 ते 30 वयोगटातील आहे. घटनास्थळावरुन पोलिसांना मोबाइल चार्जर, हेडफोन, चावी, तरुणीचे बूट आणि काही चिल्लर सापडली आहे. सध्या तरुणी नेमकी कोण आणि कुठली आहे याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. या भयंकर गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांचे 150 जवान आणि अधिकारी आता कामाला लागले आहेत.
मारेकरी हा प्रचंड हुशार असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. कारण तरुणीची ओळख पटू नये यासाठी मारेकऱ्याने तरुणीचं मुंडकं झाटलं. त्यानंतर तिच्या शरीरावरील सर्व कपडे, पायातील पैंजण, शरीरावरील इतर दागिने या सगळ्या गोष्टी काढून घेतल्या आहेत. सध्या पोलीस तरुणीचं गायब असलेलं मुंडकं शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
ऑनर किलिंग! पतीने केली पत्नीची हत्या, मुंडकं रस्त्यावर मिरवलं; व्हायरल व्हीडिओमुळे खळबळ
पोलिसांच्या 9 वेगवेगळ्या टीम या तरुणीचं छाटलेलं मुंडकं शोधत आहेत. तसेच ही तरुणी नेमकी कोण याचाही शोध घेतला जात आहे. यासाठी गर्ल्स हॉस्टेल, नर्सिंग कॉलेज, लॉज, शहरातील दुकानं आणि अशी काही ठिकाणं जिथे काही पुरावे मिळण्याची आशा आहे त्या सगळ्या ठिकाणी पोलीस सर्च ऑपरेशन करत आहेत. मात्र, 24 तास उलटून गेले तरी या प्रकरणी अद्याप पोलिसांना एकही पुरावा सापडलेला नाही. त्यामुळे या गुन्ह्याचा छडा लावणं हे पोलिसांसमोर एक मोठं आव्हान बनलं आहे.
ADVERTISEMENT