कोलकाता: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोलकातामधील ब्रिगेड परेड मैदानावरील जाहीर सभेत बोलताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर प्रचंड टीका केली. ममता बॅनर्जी यांच्या सरकारने बंगालच्या स्वप्नांचा चुराडा केला. त्यामुळे बंगालची जनता त्यांना माफ करणार नाही. असं म्हणत मोदींनी त्यांच्यावर निशाणा साधला.
ADVERTISEMENT
पंतप्रधान मोदी हे आज (7 मार्च) बंगालच्या दौऱ्यावर आहेत. याचेवळी पंतप्रधान मोदी हे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसाठी कोलकात्यामध्ये जाहीर सभा घेतली. यासाठी कोलकातामधील ब्रिगेड ग्राउंडवर प्रचंड मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं होतं. दरम्यान, याच जाहीर सभेच्या ठिकाणी अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी देखील भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
जाहीर सभेतून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर घणाघात:
पाहा पंतप्रधान मोदी यांच्या सभेतील काही महत्त्वाचे मुद्दे:
-
कुणाला दुखापत व्हावं असं आम्हाला वाटत नाही. पण स्कूटीने नंदीग्राममध्येच पडण्याचं ठरवलं असेल तर त्याला आम्ही तरी काय करणार?
-
दीदी बरं झालं आपण स्कूटीवरुन पडल्या नाहीत. नाहीतर ज्या राज्यात स्कूटी बनली त्या राज्याला आपण शत्रू बनवलं असतं.
-
मातीबाबत बोलणाऱ्यांनी बंगालची इंच-इंच जमीन दलालांच्या हातात सोपवली आहे.
-
बंगालमध्ये घरात घुसून हल्ले होत आहेत. यातून या लोकांचा क्रूर चेहरा दिसला आहे.
-
गरीब आणखी गरीब व्हावं असंच काम त्यांनी केलं आहे.
-
आपण मला सांगा मागील 10 सालात येथील टीएमसी सरकारमुळे काही परिवर्तन झालं?
-
बंगालमध्ये फक्त सत्ता मिळवणं हे आमचं लक्ष्य नाही
-
जे बंगालकडून हिसकावून घेतलंय ते आम्ही परत मिळवून देऊ
-
घुसखोरांना आम्ही रोखू, घुसखोरांना इथून बाहेर काढू
-
ममता दीदींनी आपल्या स्वप्नांचा चुराडा केला.
-
परिवर्तनासाठी आपण दीदींना संधी दिली होती.
-
पण ममता दीदी आणि त्यांच्या नेत्यांनी तुमचा विश्वास तोडला
-
बंगालने परिवर्तनासाठी ममता दीदींवर विश्वास दाखवला.
-
कोलकाता, बंगाल हे संपूर्ण भारताचं प्रेरणा स्थळ आहे.
-
बंगालमधील महान व्यक्तींनी एक भारत, श्रेष्ठ भारत ही भावना सशक्त केला.
-
राजकीय जीवनात शेकडो रॅलींना संबोधित करण्याची संधी मला मिळाली, पण एवढ्या मोठ्या कार्यकाळात मला एवढ्या विशाल जनसमूहाचा आशीर्वाद मिळाल्याचं दृश्य आज इथे पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT