डबलडेकरचा ‘इलेक्ट्रिक अवतार!’ ठाकरे सरकारचं मुंबईकरांना स्पेशल गिफ्ट

मुंबई तक

• 02:23 AM • 28 Jan 2022

मुंबई: मुंबईत लवकरच 900 इलेक्ट्रिक बसेस रस्त्यावर धावताना दिसणार आहेत. शहरात 10,000 इलेक्ट्रिक बसेस आणण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याचे राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज (27 जानेवारी) सांगितलं. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही मोठी भेट असणार आहे. मुंबईत लवकरच महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. अशावेळी आता सत्ताधारी शिवसेनेकडून मुंबईकरांना नवनव्या गोष्टी दिल्या जात आहेत. डबल डेकर बसेस या […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: मुंबईत लवकरच 900 इलेक्ट्रिक बसेस रस्त्यावर धावताना दिसणार आहेत. शहरात 10,000 इलेक्ट्रिक बसेस आणण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याचे राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज (27 जानेवारी) सांगितलं. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही मोठी भेट असणार आहे. मुंबईत लवकरच महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. अशावेळी आता सत्ताधारी शिवसेनेकडून मुंबईकरांना नवनव्या गोष्टी दिल्या जात आहेत.

हे वाचलं का?

डबल डेकर बसेस या मुंबईची शान आहेत. त्या आता नव्या रुपात आणि ते देखील एसी बसेस असणार आहेत. याच विषयी आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘आम्हाला जास्तीत जास्त डबल डेकर बसेस आणायच्या आहेत. आम्ही बेस्टमध्ये 900 नवीन बसेस आणल्या आहेत. आम्हाला इंधनावर चालणाऱ्या बसेसऐवजी इलेक्ट्रिक बस आणायच्या आहेत.’

बेस्ट समितीने मंगळवारी 900 एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बससाठी 12 वर्षांचा करार मंजूर केला. या प्रकल्पासाठी एकूण 3600 कोटी रुपये खर्च येणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. सध्या राज्य सरकारने यासाठी 992 कोटी रुपये मंजूर केले आहेत.

महाराष्ट्र स्वच्छ हवा प्रकल्पांतर्गत हा निधी देण्यात आला आहे. बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र म्हणाले, ‘या वर्षी 225 डबलडेकर बसेसची पहिली तुकडी येण्याची अपेक्षा आहे. तर दुसरी तुकडी 225 बसेससह पुढील वर्षी मार्चपर्यंत येण्याची अपेक्षा आहे. याशिवाय उर्वरित 450 बसेस जून 2023 पर्यंत रस्त्यावर धावताना दिसतील.’

चंद्रा म्हणाले, ‘सध्या मुंबईत 48 डबलडेकर बस धावत आहेत. 900 AC इलेक्ट्रॉनिक डबल डेकर बसेस ज्या इको-फ्रेंडली देखील आहेत. त्या येत्या एका दशकासाठी सेवेत असतील.’

याबाबत आदित्य ठाकरे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘बेस्ट डबल डेकर बस आता इलेक्ट्रिक असतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी वैयक्तिकरित्या मुंबईच्या प्रतिष्ठित डबल डेकर बसेसचे पुनरुज्जीवन करण्यास उत्सुक आहोत.’

लाल एसटी ते शिवशाही.. एसटीचा चित्तवेधक इतिहास

ते पुढे म्हणाले की, ‘आम्ही अधिकाधिक डबल डेकर बस आणणार आहोत.’ या बसेसमुळे मुंबईकरांना मात्र अधिक सुखकर प्रवास करता येणार आहे.

    follow whatsapp