Bhau Torsekar : "शरद पवार टॅलेंटेड माणूस, मोदींनाही मागे टाकू शकेल असा...", काय म्हणाले भाऊ तोरसेकर?

भाऊ तोरसेकर म्हणाले शरद पवार यांनी काँग्रेस सोडली, तेव्हा घडी विस्कटायला सुरूवात झाली. त्यामुळे कुणालाही कुठेही जायला यायला काही फरक राहिला नाही असं म्हणत भाऊ तोरसेकर यांनी एकूणच शरद पवार यांनी घेतलेल्या वेगवेगळ्या राजकीय निर्णयांवर टीका केली.

Mumbai Tak

मुंबई तक

12 Jan 2025 (अपडेटेड: 12 Jan 2025, 05:52 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

"शरद पवार हा अत्यंत टॅलेंटेड माणूस आहे, पण..."

point

"नुकसान फक्त शरद पवार यांचं किंवा पवार घराण्याचं नाही"

point

"महाराष्ट्रामध्ये मोदींनाही मागे टाकू शकेल असा नेता होता"

Bhau Torsekar on Sharad Pawar : राज्यातील वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांनी नुकतंच शरद पवार यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं आणि याची मोठी चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार यांनी काँग्रेस सोडली, तेव्हा घडी विस्कटायला सुरूवात झाली. त्यामुळे कुणालाही कुठेही जायला यायला काही फरक राहिला नाही असं म्हणत भाऊ तोरसेकर यांनी एकूणच शरद पवार यांनी घेतलेल्या वेगवेगळ्या राजकीय निर्णयांवर टीका केली. 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्यांनी शरद पवार यांच्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Laxman Hake on BJP : "आम्ही BJPला निवडून देण्याचं आवाहन केलं, पण आता गिल्टी फील होतंय"

"मी असं मानतो, की टॅलेंट हे तुमच्या गरजा भागल्यानंतर ते समाजाचं असतं. शरद पवार हा अत्यंत टॅलेंटेड माणूस आहे, पण टपोरीगिरी करण्यातच सगळं आयुष्य खर्च केलं. ते नुकसान फक्त शरद पवार यांचं किंवा पवार घराण्याचं नाही. ते नुकसान महाराष्ट्राचं आहे. कारण, महाराष्ट्रामध्ये मोदींनाही मागे टाकू शकेल असा नेता होता ना. पण त्यांचं पोटेन्शिअल वापरलं नाही गेलं.माझा पवारांवर राग आहे, राग आहे, कारण ते माझं टॅलेंट आहे, माझा हक्क आहे त्यावर. घरात आपलं असतं, जे मूल हुशार आहे, त्याचे टक्के कमी झाल्यावर आपल्याला राग येतो. माझा पवारांवरचा राग तो आहे. ज्याचं जे टॅलेंट आहे, ते वापरलं गेलं पाहिजे. त्यादृष्टीने त्याच्याकडे पाहिलं पाहिजे होतं. मला वाटतं मराठी माध्यमांनी पवारांना बिघडवलं, कारण पवारांना त्यांच्या चुका कान धरून दाखवायला पाहिजे होत्या" असं भाऊ तोरसेकर यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा >> Beed Sarpanch Accident : राखेची वाहतूक करणाऱ्या ट्रकने उडवलं, बीडमध्ये पुन्हा एका सरपंचाचा मृत्यू, अपघात की...

जर मराठी माध्यमांनी पवारांना चुका सांगितल्या असत्या, तर पवार हा माणूस ट्रॅकवर राहिला असता आणि देशाचा पंतप्रधान होण्याचा चान्स असलेला तो एक माणूस होता. शरद पवार यांनी घेतलेल्या काही निर्णयांपासून राज्याच्या राजकारणात सभ्यतेची ओहोटी सुरू झाली असं भाऊ तोरसेकर म्हणाले. 

उद्धव ठाकरेंबद्दल काय म्हणाले भाऊ तोरसेकर?

उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत जातील का? असं विचारलं असता भाऊ तोरसेकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांना परत घेतील का ते विचारा. तुमची गरज आहे का हा प्रश्न पडला पाहिजे. अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांनी दोघांनीही विचारांच्या पलीकडे जात निर्णय घेतले. पण अजित पवारांनी कटेंगे तो बटेंगेचा विरोध केला. मी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा आहे हे अजितदादांनी दाखवलं. पण उद्धव ठाकरेंनी नको तेवढं सेक्युलर होऊ दाखवलं आणि त्यांनीच परतीचे दोर कापले.


    follow whatsapp