Gram panchayat Result : BJP प्रदेशाध्यक्षांच्या मुलीच्या पॅनेलचा दारुण पराभव

मुंबई तक

20 Dec 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:24 AM)

जळगाव : येथील मोहाडी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत रघुनाथ पाटील अर्थात सी. आर. पाटील यांची मुलगी भाविनी पाटील सदस्यपदी विजयी झाल्या आहेत. मात्र त्याचवेळी त्यांच्या पॅनेलला पराभव स्वीकारावा लागला आहे. आज जाहीर होत असलेल्या ग्रामपंचायत निकालात त्यांच्या ग्रामविकास पॅनेलमधील अवघे तीन सदस्य निवडून आले आहेत. मोहाडी ग्रामपंचायतीमध्ये भाविनी पाटील यांचे प्रतिस्पर्धी शरद पाटील […]

Mumbaitak
follow google news

जळगाव : येथील मोहाडी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत रघुनाथ पाटील अर्थात सी. आर. पाटील यांची मुलगी भाविनी पाटील सदस्यपदी विजयी झाल्या आहेत. मात्र त्याचवेळी त्यांच्या पॅनेलला पराभव स्वीकारावा लागला आहे. आज जाहीर होत असलेल्या ग्रामपंचायत निकालात त्यांच्या ग्रामविकास पॅनेलमधील अवघे तीन सदस्य निवडून आले आहेत.

हे वाचलं का?

मोहाडी ग्रामपंचायतीमध्ये भाविनी पाटील यांचे प्रतिस्पर्धी शरद पाटील यांच्या लोकशाही उन्नती पॅनलला ९ पैकी ६ जागा मिळाल्या आहेत. तसंच लोकनियुक्त सरपंचपदही शरद पाटील यांच्या पॅनलला मिळालं आहे. तर भाविनी पाटील यांच्या ग्रामविकास पॅनेलचे ३ सदस्य निवडून आले आहेत.

भाजपमधील अंतर्गत संघर्षात पराभव :

मोहाडीमध्ये यंदा भाजप विरुद्ध भाजप अशी थेट लढत होती. भाविनी पाटील यांच्या पॅनलला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा होता, परंतु निकालात भाजपच्याच दुसऱ्या पॅनलमुळे भाविनी पाटील यांच्या पॅनेलला पराभव पत्करावा लागला आहे. यामुळे भाजपमधीलच अंतर्गत वाद समोर आला आहे.

भाविनी पाटील यांचीही दुसरी पंचवार्षिक निवडणूक आहे. गत निवडणुकीला त्या लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र यंदा इथलं सरपंचपद एसटी प्रवर्गासाठी राखीव झाल्यानं त्या स्वतःच्या पॅनेलसह सदस्यपदासाठी रिंगणात उतरल्या होत्या. गेल्या पंचवार्षिकला गावात मूलभूत सोयी-सुविधा आणि इतर बरीच कामं झाली आहेत. हीच काम आपला यंदाचा विजयही सुकर करतील, असा विश्वास भाविनी पाटील यांनी व्यक्त केला होता. मात्र त्यांना ही निवडणूक जिंकण्यात यश आलेलं नाही.

चंद्रकांत पाटील हे मूळचे जळगावमधील रहिवासी होते. मात्र, १९८९ ते गुजरातमध्ये स्थलांतरित झाले. पण त्यानंरही त्यांचा महाराष्ट्राशी संबंध कायम आहे. त्यांचे बरेचसे नातेवाईक खान्देशात आहेत. त्यामुळे जळगावमध्ये त्यांचं कायम जाणं-येणं असतं. शिवाय त्यांच्या कन्या भाविनी पाटील यांचा विवाह मोहाडीतील रामभाऊ पाटील यांच्याशी झाला आहे. याच गावातून त्या वडिलांचा राजकारणाचा वारसा पुढे चालवतं आहेत.

    follow whatsapp