भीमाशंकर ज्योतिर्लिंग वाद (bhimashankar jyotirlinga controversy) : देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी (Jyotirlinga) सहावं ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात (Maharashtra) असून, अचानक सहावं ज्योतिर्लिंग आसाममध्ये असल्याचा दावा आसाम सरकारने (assam government) केला आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण (New Controversy) झाला आहे. यावरून ठाकरे गटाने (Thackeray Faction) एकनाथ शिंदे यांच्यावर (Shinde Goverment) टीकास्त्र डागलं आहे. (Shiv Sen UBT hits out Eknath shinde over bhimashankar jyotirlinga controversy)
ADVERTISEMENT
ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून या वादावर भाष्य केलं आहे. शिंदे सरकार हे पनवती असल्याचं म्हणत शिंदेंना लक्ष्य करण्यात आलंय. ठाकरे गटाने म्हटलंय की, “महाराष्ट्रात मिंधे सरकार सत्तेत आल्यापासून राज्याला पनवतीच लागली आहे. त्यांच्या बाता विकासाच्या असल्या तरी प्रत्यक्षात महाराष्ट्राचे हक्काचे हिरावून नेण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. केंद्रापासून इतर भाजपशासित राज्यांपर्यंत सगळेच ही लूट करीत आहेत. आता या ‘पळवापळवी’त आसाममधील भाजप सरकारची भर पडली आहे.”
ठाकरे गटाने आसाम सरकारच्या दाव्यावरही प्रश्न उपस्थित केला असून, सरकारला खडेबोल सुनावले आहेत. “महाराष्ट्रातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांपैकी हे एक आहे आणि आता कोण कुठले उपटसुंभ आसाम सरकार म्हणत आहे की, सहावे ज्योतिर्लिंग भीमाशंकर नसून आसाममधील आहे. हा महाराष्ट्राच्या धार्मिक स्थळावर डाका टाकण्याचाच प्रकार आहे. बरे, सहावे ज्योतिर्लिंग जर आसाममध्ये असल्याचा तुमचा दावा आहे तर मग ही उचकी तुम्हाला आताच का लागली? हा ‘साक्षात्कार’ तुम्हाला आधी का झाला नाही?”, असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.
आसाम सरकारने भीमाशंकर ज्योतिर्लिंगावर केलेल्या दाव्यात किती तथ्य?
“….त्यामुळेच मिंधे सरकारच्या तोंडून भीमाशंकरप्रकरणी निषेधाचा”
“या सर्व फुटिरांना आधी गुजरातमधील सुरतमध्ये आणि नंतर आसाममधील गुवाहाटी येथे ‘राजाश्रय’ मिळाला होता. ‘काय झाडी, काय हाटील…’ अशी जंगी बडदास्त ठेवली गेली होती. तेथील मुक्कामापासून कामाख्या मंदिरातील ‘विधीं’पर्यंत आसाम सरकारने मिंधे गटाचा खासा पाहुणचार केला होता. त्यामुळेच मिंधे सरकारच्या तोंडून भीमाशंकरप्रकरणी निषेधाचा ‘नि’देखील निघू शकलेला नाही. ‘या पाहुणचाराच्या बदल्यातच भीमाशंकर ज्योतिर्लिंग तुम्ही त्यांना देऊन आला नाहीत ना?’ या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नालाही त्यांच्याकडे काय उत्तर आहे?”, असा प्रश्न ठाकरे गटाने शिंदे गटाला केला आहे.
“देव, देश आणि धर्मासाठी प्राण हाती घेणारा महाराष्ट्र हतबल करण्याचे मोठे षड्यंत्र रचले गेले आहे. केंद्र आणि भाजपशासित राज्यांकडून महाराष्ट्राचे उद्योग, अर्थकारण, पाणी आणि बरेच काही पळविण्याचे प्रकार या कटकारस्थानाचाच भाग आहेत. आता तर त्यांनी आमचे देवही पळविले”, असं म्हणत ठाकरे गटाने शिंदेंवर प्रहार केला आहे.
Shinde यांचा CM होण्याचा मार्ग कसा झालेला मोकळा?, ‘ही’ आहे जूनमधली क्रोनोलॉजी
“आमच्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगावरच आसामच्या भाजप सरकारने मालकी हक्क सांगितला. लाचार मिंधे सरकारकडून याविरोधात काहीच होणार नाही. राज्यातील जनतेला शिवशंभोंचा शंख फुंकावाच लागेल”, असा इशारा ठाकरे गटाने शिंदे सरकारला दिला आहे.
ADVERTISEMENT