बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनामुळे संपूर्ण मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. उत्तम देहयष्टी आणि नेहमी आपल्या फिटनेसची काळजी घेणाऱ्या सिद्धार्थचं निधन अशा पद्धतीने होईल यावर अजुनही अनेकांचा विश्वास बसत नाहीये. बिग बॉस १३ चं विजेतेपद मिळवलेल्या सिद्धार्थ शुक्लाच्या निधनावर या शो चा सूत्रसंचालक अभिनेता सलमान खाननेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT
खूप लवकर निघून गेलास सिद्धार्थ…तूझी उणीव कायम भासत राहील. कुटुंबाप्रति संवेदना असं ट्विट सलमान खानने केलं आहे.
बिग बॉस १३ मध्ये सिद्धार्थ शुक्ला आणि शेहनाझ गिलची जोडी चांगलीच गाजली होती. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सिद्धार्थ काही औषधं घेऊन झोपला मात्र सकाळी तो उठलाच नाही. त्यामुळे सिद्धार्थला तातडीने रूग्णालयात नेण्यात आलं, मात्र रूग्णालयात पोहचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
Explainer : उत्तम शरीरयष्टी असलेल्या Siddarth Shukla चं निधन, तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलं महत्वाचं कारण
मॉडेलिंगच्या क्षेत्रातून सिद्धार्थने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. यानंतर बाबुल का आंगन छुँटे ना या मालिकेतून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. याव्यतिरीक्त सिद्धार्थचे जाने पेहचाने से, ये अजनबी, लव्ह यू जिंदगी, बालिका वधू हे शो देखील खूप गाजले. बिग बॉसच्या तेराव्या पर्वाचं सिद्धार्थ शुक्लाने विजेतेपद पटकावलं होतं. सिद्धार्थ आपल्या फिटनेसबाबत नेहमीच सजग असायचा…त्यामुळे अशा अभिनेत्याच्या अकाली निधनामुळे सर्वच स्तरातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
सिद्धार्थ शुक्ला.. प्रत्येकाला जवळचा वाटणारा कलाकार!
ADVERTISEMENT